मजुरी करुन मायबापाने शिकवलं, लेकाकडून कष्टाची जाण, मेहनतीने १९ व्या वर्षी नेव्हीत भरती.

 ओम हा आईच्या गर्भात असताना ओमचे वडील भानुदास हे बैलगाडी चालवत शेताकडे जात होते. यावेळी बैलगाडी उलटल्याने अपघात झाला. अपघातात भानुदास यांच्या पायात गॅप पडल्याने भानुदास यांना लांब चालणे, जड काम करणे शक्य होत नव्हते.आई गर्भवती असताना वडिलांना अपघात झाला आणि त्यांच्या पायात गॅप पडला. यामुळे संसाराचा गाडा हाकण्याची जबाबदारी एकट्या आईवर पडली. स्वतःच्या शेतीवर घर चालवणं शक्य नसल्याने आईने इतरांच्या शेतात मजुरीला जाऊन मुलाला शिकवलं. मात्र मुलाने आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करत इंडियन नेव्हीमध्ये भरती होऊन वर्दी मिळवली. गरिबीची जण ठेऊन हट्ट न करता १९ व्या वर्षी नोकरी मिळवलेल्या मुलाचं कौतुक करताना आई वडिलांचे डोळे भरुन येतात.बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या मेंडगाव या गावातील ओम भानुदास गीते असं १९ व्या वर्षी इंडियन नेव्हीमध्ये नोकरी मिळवलेल्या तरुणाचं नाव आहे. आई-वडील, बहीण आणि ओम असं चार जणांचं त्यांचं कुटुंब. घरी पाच एकर शेती मात्र त्यातील अर्धी शेती कोरडवाहू आहे. शेतीवर अवलंबून राहून घरखर्च चालवणं शक्य होत नव्हतं.

त्यामुळे स्वतःच्या शेतीसह इतरांच्या शेतीमध्ये मोलमजुरी करून गीते कुटुंब उदरनिर्वाह चालवत होते. ओम हा आईच्या गर्भात असताना ओमचे वडील भानुदास हे बैलगाडी चालवत शेताकडे जात होते. यावेळी बैलगाडी उलटल्याने अपघात झाला. अपघातात भानुदास यांच्या पायात गॅप पडल्याने भानुदास यांना लांब चालणे, जड काम करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे ते स्वतःच्या शेतातील छोटी मोठी काम करत होते.भानुदास यांचा अपघात झाल्यामुळे त्यांना जड काम करणे शक्य नसल्याने संसाराचा गाडा हाकण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नी कमलबाई यांच्यावर आली. घरातील स्वयंपाक धुणं भांडे हे करून त्या स्वतःच्या शेतात काम करत होत्या. मात्र स्वतःच्या शेतावर उदरनिर्वाह चालवणे शक्य होत नव्हते. यामुळे स्वतःच्या शेताबरोबर इतरांच्या शेतात मजुरीला जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. जबाबदारीची जाण ठेवत त्यांनी मजुरीची लाज न बाळगता काम केलं.ओम पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकला. पाचव्या वर्गानंतर दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ओमच्या आई वडिलांनी त्याला बाहेरगावी पाठवायचं ठरवलं. गावापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या देऊळगाव राजा येथील खाजगी शाळेत दाखल केलं. मात्र शाळेची वार्षिक फी ४० हजार होती. शाळेची एवढी फी आपण कशी भरणार असा सवाल ओम याने आई वडिलांना केला.

यावेळी तू काळजी करू नको, आम्ही पैश्यांची व्यवस्था करू, तू चांगलं शिकून नोकरी मिळव, असं सांगितलं. स्वतःच्या शेतासोबत मोलमजुरी करून ओमच्या आईने ओमला दहावीपर्यंत शिकवलं. ओम सुट्ट्यांमध्ये घरी आल्यानंतर आई दुसऱ्यांच्या शेतात कामाला जायची यामुळे ओमला आईची काळजी वाटायची. आपण लवकर नोकरी मिळवून आई वडिलांचे कष्ट कमी करू अस त्याने ठरवलं.११ वी मध्ये असताना लॉकडाऊन लागले. यामुळे ऑनलाइन शिक्षण होते. मात्र ओम यांच्या घरात अँड्रॉइड मोबाईल नव्हता. आई वडिलांनी स्वतःचे आणि इतरांकडून उसने पैसे घेऊन मोबाईल घेऊन दिला. आई वडिलांची धडपड बघून आपण लवकर नोकरी मिळवू अशी जिद्द पकडली. त्यानंतर त्याच मोबाईलवर नोकर भरतीची माहिती घेतली. इंडियन नेव्हीची जागा निघाली. फॉर्म भरून परीक्षा दिली त्यात यश मिळाले. त्यानंतर ओमचे भाऊजी विनोद सांगळे यांनी ग्राउंडच्या तयारीसाठी पुण्यात बोलवले. सांगळे यांनी ओमकडून कसून सराव करून घेतले. ग्राउंड झाल्यानंतर ओमला आत्मविश्वास होता आपण यात पास होणार. एक महिन्यानंतर ओम कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल करत असताना त्याला त्याच्या भाऊजींचा कॉल आला तू इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्ट झालायस. यावर त्याला विश्वास बसला नाही त्याने मोबाईलमध्ये तपासलं असता तो भरती झाला होता. यावेळी त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.आमची कौटुंबिक परिस्थिती प्रचंड नाजूक होती. या परिस्थितीमध्ये आई-वडिलांनी मला शिकवलं. माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक कष्ट सोसले. आज मी नोकरीला लागलोय याचं सर्व श्रेय आई-वडील, बहीण, भाऊजी विनोद सांगळे, शिक्षक यांना जाते. आपण जिद्द धरली तर नक्कीच यश मिळू शकतो असं ओम विश्वासाने सांगतो.ओमने आजपर्यंत कधीच आम्हाला इतर मुलांसारखा हट्ट केला नाही. शिक्षणाशिवाय त्याने कधी आम्हाला कुठली गोष्ट मागितली नाही. त्याने आमची परिस्थिती बदलवण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास केला. आज मुलगा 19 व्या वर्षी नोकरीला लागला. आम्हाला आमच्या लेकाचा सार्थ अभिमान आहे असं त्याची वडील भानुदास गीते सांगतात.

  • Related Posts

    इंजेक्शन देताच तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंबियांनी घेतले होते व्याजाने पैसे, डॉक्टरांवर गंभीर आरोप.

    जळगावात एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. हर्षल थाडे या मुलाला चालता येत नसल्याने रुग्णालयात दाखल केले होते, जिथे डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर…

    डिनरला माशांवर ताव, तितक्यात बायकोचा हल्ला अन् काही मिनिटांत..; माजी डीजीपींसोबत काय घडलं?

    कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची त्यांच्याच पत्नीने हत्या केल्याचा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी पल्लवी यांनी आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    इंजेक्शन देताच तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंबियांनी घेतले होते व्याजाने पैसे, डॉक्टरांवर गंभीर आरोप.

    इंजेक्शन देताच तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंबियांनी घेतले होते व्याजाने पैसे, डॉक्टरांवर गंभीर आरोप.

    डिनरला माशांवर ताव, तितक्यात बायकोचा हल्ला अन् काही मिनिटांत..; माजी डीजीपींसोबत काय घडलं?

    डिनरला माशांवर ताव, तितक्यात बायकोचा हल्ला अन् काही मिनिटांत..; माजी डीजीपींसोबत काय घडलं?

    अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार; 2 गोळ्या झाडून हल्लेखोर पसार.

    अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार; 2 गोळ्या झाडून हल्लेखोर पसार.

    26/11 हल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात, माधव भांडारींनी आधी खळबळ उडवली, आता म्हणतात, सरकारला 5 महिने आधीच…

    26/11 हल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात, माधव भांडारींनी आधी खळबळ उडवली, आता म्हणतात, सरकारला 5 महिने आधीच…