
ऊस तोडणीच्या कामावर असताना वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील उमरी येथील २६ वर्षीय महिलेची आकाशसोबत ओळख झाली. दोघांमध्ये प्रेम फुलले.अनैतिक प्रेम प्रकरणातून समाजात बदनामी झाली, म्हणून आकाश बल्लाळ या २५ वर्षीय तरुणासह महिलेची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी पत्रकार परिषदेत दिली. या दोघांचेही मृतदेह यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमध्ये आढळले होते.ऊस तोडणीच्या कामावर असताना वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील उमरी येथील २६ वर्षीय महिलेची आकाशसोबत ओळख झाली. दोघांमध्ये प्रेम फुलले. ८ मार्च रोजी महिला पती आणि लहान मुलाला सोडून आकाशसोबत पुण्याला गेली. मात्र दोघांच्या अनैतिक संबंधांमुळे समाजात कुटुंबाची बदनामी झाल्याचा राग आकाशच्या नातेवाइकांमध्ये होता.
आकाशचा भाऊ विकास बल्लाळ, चुलत भाऊ सज्जन बल्लाळ, जावई विजय शिकारे, मामा विशाल शिकारे यांनी दोघांचा शोध घेणे सुरू केले. आकाश महिलेसह पुण्यात असल्याची माहिती मिळाली.त्यांचा शोध घेऊन नातेवाईकांनी दोघांचे लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले आणि दोघांनाही गावाकडे आणले. त्यांना पुसदच्या लॉजवर ठेवले. नंतर त्यांच्या हत्येचा कट रचला.रात्री मुख्य आरोपी असलेला जावई विजय शिकारे याने त्याचा सहकारी राजेश गोदमले, धमर्राज तुकाराम बोडखे यांना दिग्रसला बोलविले. सोबतच आकाश आणि महिलेला विठाला ते साकरीदरम्यान असलेल्या शेतीच्या बाजूला असलेल्या जंगलात आणले. नंतर गोदमले आणि बोडखे यांच्या माध्यमातून दुहेरी हत्याकांड घडविले. या प्रकरणात पोलिसांनी विजय शिकारे, राजेश गोदमले, धर्मराज बोडखे आणि विकास बल्लाळ यांना अटक केली आहे. विशाल शिकारे फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
सातारा जिल्ह्यातील वाठार (ता. कराड) येथून गुरुवारी सायंकाळी बेपत्ता झालेल्या पाच वर्षीय मुलीचा मृतदेह शुक्रवारी आढळला. या मुलीचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. रात्रभर ड्रोनच्या साह्याने शोधमोहीम राबवल्यानंतर शुक्रवारी सकाळी शेतात मुलीचा मृतदेह सापडला. या प्रकरणी सोळा वर्षीय मुलीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.मुलगी गुरुवारी सायंकाळी अंगणात खेळत होती. तेथून अचानक ती बेपत्ता झाली. रात्री मुलगी घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी गावात शोध सुरू केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी गावात दाखल झाले. पहाटे पाचच्या सुमारास शेतात मृतदेह आढळला.
Video Player
00:00
00:00