संत ज्ञानेश्वर विद्यालयात मोबाईल रुपी कंस मामाचा वध करून मैदानी खेळ जनजागृती दहीहंडी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये मोबाईल पासून सुटका होण्यासाठी आपल्या शरीरासाठी मैदानी खेळ किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्याची किती आवश्यकता आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी. आजकाल मैदानी खेळांचं प्रमाण कमी झालंय. विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचं महत्त्व कळावं यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली.
आजच्या तंत्र युगात मोबाईल सारख्या कंस मामाचा वध करणे जरुरी आहे . म्हणून छोटेस्या कृष्णाच्या हस्ते मोबाईल रुपी कंस मामाचा वध करण्याची जिवंत आरास इयत्ता दुसरीच्या मुलांनी सादर केली .शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मोबाईल न वापरण्याची शपथ घेतली. मैदानी खेळ जनजागृती दहीहंडी चे आयोजन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी मोबाईलचे दुष्परिणाम काय होतात ते मुलांना सांगितले. सूत्रसंचालन सोनाली चौधरी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.












