
भडगाव शहरात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी.
भडगाव : शहरात चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती निमित्ताने प्रतिमा मिरवणूक सकाळी आठ वाजता जैन स्थानकपासुन सुरू झाली. शहरातील रथ मार्ग, बस स्थानक परिसर अतिशय शांतपणे मंगल वाद्य वाजवून लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयात सांगता झाली.
भगवान महावीर जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. लहान मुलांच्या नाटिका, धार्मिक गीत, संगीतमय कार्यक्रम संपन्न झाले. या प्रसंगी मुमुक्षु श्री तेजस संजय कोचर हा तरुण १९ एप्रिल रोजी बुलढाणा येथे जैन भगवती दिक्षा घेणार आहे त्यांचा व कोचर परिवाराचा सन्मान व सत्कार या वेळी सखल जैन समाजातर्फे करण्यात आला. या प्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी मुमुक्षु तेजस कोचर यांचा सत्कार करून त्यांचा गौरव केला.
समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समाजातील विविध संस्थावर निवड झालेल्या व्यक्तींचा सत्कारही या वेळी करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री वर्धमान जैन श्रावक संघ, जैन नवयुवक मंडळ, एकता महिला मंडळ यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आदित्य भंडारी, शोभा लुनावत यांनी केले तर आभार वरुण चोरडिया यांनी मानले.