एप्रिल महिन्यातील विभागीय लोकशाही दिन आणि विभागीय महिला लोकशाही दिन मंगळवारी होणार.

एप्रिल महिन्यातील विभागीय लोकशाही दिन आणि विभागीय महिला लोकशाही दिन मंगळवारी होणार. नाशिक, : येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवार, दिनांक 15 एप्रिल, 2025 रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय महसूल उपायुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली आहे. दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने लोकशाही दिन उपक्रम मंगळवारी होणार आहे.

नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 11 वाजता होणारा विभागीय लोकशाही दिन कार्यक्रम विभागातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दाखल झालेली प्रकरणांबाबत तक्रारदार समाधानी नसतील तर तेच या लोकशाही दिनामध्ये अर्ज दाखल करु शकतात.

दरम्यान, याच वेळेस विभागीय महिला लोकशाही दिनाचेही आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेद्वारे सोडवणूक करण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ज्या समस्याग्रस्त व पीडित महिलांनी तालुकास्तर व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनात अर्ज केलेले असतील व त्यांच्या समस्येचे उत्तर मिळाले नसेल, त्यांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे टोकन नंबरसह त्यांचे अर्ज दिनांक 15 एप्रिल रोजी विभागीय महिला लोकशाही दिनात सकाळी 11 वाजता सादर करावेत, असे आवाहन महिला व बालविकास विभाग, नाशिकचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांनी केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.