जळगावमध्ये ११ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजन.

जळगावमध्ये ११ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजन.
जळगाव, : महाराष्ट्र राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीच्या संधी, राज्यातील उत्पादने यांची निर्यातवृध्दी तसेच औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद शुक्रवारी, ११ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज, एमआयडीसी पोलीस स्टेशनजवळ, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.

या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे, राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी गुंतवणूक आकर्षित करणे, राज्यातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे. परिषदेत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मार्गदर्शन करणार आहेत.या गुंतवणूक परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्रांमध्ये, विशेषतः कृषी क्षेत्रातील उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या उद्योगांसाठी गुंतवणूकीच्या संधींवर चर्चा केली जाईल. जिल्हा उद्योग केंद्र, जळगावचे महाव्यवस्थापक यांनी जिल्ह्यातील औद्योगिक संघटना, उद्योजक, औद्योगिक समूह, सनदी लेखापाल, आणि उद्योग व्यवसायांशी संबंधित शासकीय विभागांना या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.