धक्कादायक! दारूच्या नशेत दिग्दर्शकाने निष्पापांवर चढवली गाडी, १ ठार ८ जखमी, सोबतच्या महिलेचा पळायचा प्रयत्न पण…

कोलकाता येथे दिग्दर्शकाने दारू पिऊन रस्त्यावरील माणसांवर गाडी चढवली आहे. त्यामुळे तिथे एकाचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले आहेत.मुंबई- कोलकातामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगाली चित्रपट आणि टीव्ही मालिका दिग्दर्शक सिद्धांत दास याने दारू पिऊन गर्दीत गाडी घुसवली, ज्यामुळे जीवितहानी आणि गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. सिद्धांत दासच्या गाडीच्या टक्करमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल बोलायचे झाले तर, ही घटना पश्चिम बंगालमधील ठाकूरपुकुर येथे घडली. अपघातानंतर तिथे उपस्थित असलेले लोक खूप संतप्त झाले होते. लोकांनी सिद्धांतला मारहाण केली तसेच तर त्याच्या गाडीची तोडफोडही केली.या दुर्दैवी अपघातानंतर स्थानिक लोकांचा संताप रस्त्यावर दिसून येत होता. अनेकांनी गाडी चालवणाऱ्या सिने दिग्दर्शकाला मारहाण केली.

त्यानंतर पोलिसांनी येऊन दिग्दर्शकाला संतप्त जमावातून बाजूला काढले आणि त्याला ताब्यातही घेतले. याशिवाय गाडीत दिग्दर्शकाच्या मागे एक महिलाही बसली होती. पण अपघातानंतर ती महिला गाडीतून उतरली आणि पळून गेली. नंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले.तिथल्या स्थानिकांनी सांगितले की ठाकूरपुकुर हा खूप वर्दळीचा विभाग आहे. या मार्गावर अपघात होण्याची शक्यता जास्त असते. एका व्यक्तीने सांगितले की, गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या महिलेने दिग्दर्शकाला चिथावणी दिली, त्यानंतर ही घटना घडली.

त्याच वेळी, अनेक लोकांचा असाही दावा होता की असे अपघात काही नवीन नाहीत आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ते बरेचदा इथे घडत असतात. एका व्यक्तीने सांगितले की रविवार असल्याने या परिसरात खूप गर्दी होती. पण गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणताही पोलिस तिथे तैनात नव्हता. जर पोलिस तिथे असते आणि गर्दीवर नियंत्रण ठेवले असते तर हे घडले नसते आणि इतक्या लोकांना विनाकारण समस्यांना तोंड द्यावे लागले नसते. तसेच या अपघातात एकाचा निष्कारण बळी गेला नसता.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.