
जळगाव समाज कल्याण कार्यालयात अभ्यागत भेटीसाठी विशेष वेळ निश्चित.
जळगाव, : मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र शासनाने 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त,
समाज कल्याण, कार्यालय, जळगाव या कार्यालयाशी संबंधित नागरिकांच्या अडचणी, प्रश्न, समस्या इत्यादी जाणून घेऊन त्यांचे नियमानुसार निराकरण करण्यासाठी, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड,
जळगाव येथे अभ्यागतांना भेटण्यासाठी कार्यालयीन दिवशी दुपारी ३.०० ते ५.०० वाजेपर्यंतची विशेष वेळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी नागरिकांना या वेळेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.