प्रेमसंबंध तोडले, प्रियकराला बसला धक्का : प्रेयसीचे फोटो केले व्हायरल !

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तरुणाने तरुणीसोबत काढलेल्या फोटोवर अश्लिल शिवीगाळ लिहून तो इन्सटाग्रावर स्टोरी ठेवला. हा धक्कादायक प्रकार दि. ५ रोजी उघडकीस आला. याप्रकरणी त्या तरुणाविरुद्ध शनिपेठ पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात तरुणी वास्तव्यास असून ती शिक्षण घेत आहे. गेल्या काही वर्षांपुर्वी गावात राहणारे तिचे काका मयत झाल्याने ती कुटुंबियांसह त्यांच्या घरी गेली होती.

याठिकाणी तिच्या काकांचा भाच्यासोबत त्या तरुणीची ओळख झाली. त्यांच्यात नेहमी फोनवर बोलणे होत असल्याने त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. यावेळी त्यांनी सोबत फोटो देखील काढले होते. त्यानंतर तरुण दारुच्या नशेत तरुणीवर संशय घेवून भांडण करीत असल्यामुळे तरुणीने त्याच्यासोबत संबंध तोडून टाकले होते. प्रेमसंबंध तोडल्याचा राग आल्याने त्याने तीन वर्षांपुर्वी रात्रीच्या सुमारास तरुणीसोबतचे फोटो त्यांच्या कॉमन व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केला होता. त्यावेळी त्या दोघांच्या नातेवाईकांची बैठक होवून तरुणाने त्या तरुणीचे फोटो डिलीट केले आणि तरुणीसोबत यापुढे कोणतेही संबंध ठेवणार नाही अशी हमी दिली होती. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती.

तरुणीचे काका आणि मावशी हे दोन दिवसांपुर्वी दि. ५ रोजी त्यांच्याकडे आले होते. त्यावेळी रात्रीच्या सुमारास तरुणाने त्याच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तरुणीसोबतचा फोटो आणि त्यावर अश्लिल भाषेत शिवी लिहून तो फोटो स्टोरीवर ठेवला होता. त्याचे स्क्रिनशॉर्ट तरुणीच्या काकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये काढून ठेवले आहे. त्यानंतर दोन तासानंतर त्याने ती स्टोरी डिलीट केली होती. तरुणीचे कुटुंबिय हे तीचे लग्न जमविण्यासाठी स्थळ शोधत आहे. त्याबद्दल त्या तरुणाला समजल्यामुळे त्याने तरुणीचे लग्न मोडावे किंवा जमू नये या हेतूने त्या तरुणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. दरम्यान, तरुणीने तात्काळ शनिपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.