अंबाबाईच्या दर्शनाआधी पंचगंगेत उतरले; पाण्यात उतरताच धाप लागली आणि… तरुणासोबत भयंकर घडलं.

कोल्हापुरात महालक्ष्मी देवीच्या दर्शनाआधी तरुण पंचगंगेत आंघोळीसाठी उतरले होते. यावेळी एका तरुणाला धाप लागली आणि तो नदीत बुडू लागला.सध्या सुट्टीचा हंगाम सुरू होत आहे. सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक कोल्हापुरात दाखल होऊन श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाला येतात. यावेळी अनेक पर्यटक देवीच्या दर्शनाला जाण्याआधी पंचगंगा नदीत अंघोळ करतात. असाच एक तरुणांचा ग्रुप सुट्ट्यांमध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आला होता. ७ ते ८ जणांचा ग्रुप देवीच्या दर्शनाला जाण्याआधी पंचगंगा नदीत आंघोळीसाठी गेला. यातील एका तरुणाचा पंचगंगा नदीत बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. शंकर जालिंदर गवळीकर (वय ३२, रा. मिरकल, बिदर, कर्नाटक) असं मृत तरुणाचं नाव असून ही घटना रविवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी की, सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असून शनिवारी जोतिबाची यात्रा देखील आहे. यासाठी अनेक भक्त आणि पर्यटक कोल्हापुरात दाखल होत आहेत. उन्हाळ्यात काहीसा थंडावा मिळावा यासाठी अनेक पर्यटक पंचगंगेत जातात. तसंच ज्योतिबाला जाताना पंचगंगेत स्नान करून जातात.बिदर कर्नाटक येथे राहणारा शंकर हा त्याच्या आठ ते दहा मित्रांसोबत शनिवारी रात्री श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला निघाला होता. ते सर्व जण पहाटे कोल्हापुरात पोहोचले. दर्शनाला जाण्यापूर्वी ते पंचगंगा घाटावर अंघोळीसाठी आले. सर्वांनीच नदीत उड्या घेतल्या.

मात्र यावेळी शंकरला पोहता येत नसल्याने पाण्यात उतरताच त्याला धाप लागू लागली, त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा जीव गुदमरू लागला. त्यानंतर हळूहळू खाली बुडू लागला.शंकर नदीत बुडत असल्याचं त्याच्या मित्रांना कळताच मित्रांनी आरडाओरडा करून मदतीसाठी लोकांना बोलावलं. पण शंकर तोपर्यंत पाण्यात बुडाला होता. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस घाटावर दाखल झाले. उदय निंबाळकर यांनी पाण्यात उतरून तरुणाचा शोध सुरू केला. सकाळी साडेनऊच्या सुमारास शंकरचा मृतदेह सापडला. मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.