श्री.आप्पासो.देवरे विद्यालयात राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न

श्री.आप्पासो.देवरे विद्यालयात राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न

नंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे श्री.धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित श्री. आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त डॉ.सी.व्ही.रमण व भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके,कार्यशाळा संयोजक सी.व्ही.नांद्रे, एम.डी.नेरकर, व्याख्याते एम.एस.मराठे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे व्याख्याते एम.एस.मराठे यांनी चांद्रयान एक,दोन,व तीन मोहीमेतील चढ- उतारांची वैभवशाली सखोल माहिती आपल्या व्याख्यानाद्वारे मांडत,स्वरचित विज्ञान गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकलीत. विद्यालयातील इ.दहावीतील कु. निता मराठे,हिने पीएसएलव्ही ची प्रतिकृती तयार करून मिसाईल बनावट ते प्रत्यक्ष कार्यकृतीची माहिती सादर केली.कु.सिद्धी मराठे हिने प्रज्ञान रोव्हरची बनावट व कार्यकृती विशद केली.कु.निकिता पाटील हिने सौर घड्याळाची प्रतिकृतीसह सौर ऊर्जेच्या साहाय्याने कालमापन स्पष्ट केले.कार्यशाळेत विज्ञान शिक्षक सी.व्ही.नांद्रे यांच्या संयोजनातून,प्रात्यक्षिकाद्वारे पांढऱ्या कागदापासून विक्रम लॅंडर ची प्रतिकृती बनवण्याचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. कार्यशाळेतील विद्यार्थ्यांचे सादरीकरणाचे अध्यक्षीय भाषणातून डी.डी.साळुंके यांनी कौतुक करून इस्रोच्या विविध उपक्रमांची माहिती आपल्या मनोगतातून सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक डी.बी. भारती तर आभार वाय.डी.बागुल यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षिका आर.बागुल, एस.एच.गायकवाड, व्ही.बी.अहिरे,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी डी.बी.पाटील, एच.एम.खैरनार, एस.जी.पाटील आदींनी संयोजन व सहकार्य केले.

  • Related Posts

    बाभुळगाव येथील शेत रस्त्यांचे प्रश्न एरणीवर आगामी निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा शेतकऱ्यांच्या इशारा लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने ठरताहेत फेल…

    बाभुळगाव येथील शेत रस्त्यांचे प्रश्न एरणीवर आगामी निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा शेतकऱ्यांच्या इशारा लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने ठरताहेत फेल… धरणगाव‌ तालुका प्रतिनिधि – राजु बाविस्कर तालुक्यातील बाभुळगाव येथील शेत रस्त्यांची अवस्था अतिशय…

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अरीज बेग मिर्झा चोपडा येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक.

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अरीज बेग मिर्झा चोपडा येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक. चोपडा :- पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांचा काही फायदा होत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.