रिपब्लिकन पक्षाचे म.उपविभागिय भाग एरंडोल यांना सजा — उमरे ,मालखेडे, फरकांडे येथील तलाठी बालाजी बापूराव लोंढे यांची चौकशी होऊन कारवाई होणे बाबत…

रिपब्लिकन पक्षाचे म.उपविभागिय भाग एरंडोल यांना सजा — उमरे ,मालखेडे, फरकांडे येथील तलाठी बालाजी बापूराव लोंढे यांची चौकशी होऊन कारवाई होणे बाबत… एरंडोल येथे दि. 2/4/2025 रोजी रिपब्लिकन पक्षाचे एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीणभाऊ बाविस्कर, तालुका सचिव देवानंदभाऊ बेहेरे, जिल्हा उपाध्यक्ष सुनीलभाऊ खोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिल विषयावर निवेदन सादर करण्यात आले आहे.सदर निवेदनात असे नमूद केले आहे की, सजा उमरे,मालखेडा, फरकांडे ची तलाठी बालाजी बापूराव लोंढे आपला मनमानी कारभार करीत असून मागासवर्गीय यांना नाहक त्रास देऊन शासकीय योजना पासून वंचित ठेवत असल्याचे दिसून आले.

मौजे उमरे येथील मागासवर्गीय लाभार्थी यांना शासकीय कामी दाखले उतारे योजना कामी मागितला असता, ” त्यांना माझ्याकडे पाठवा ” मी तुम्हाला देऊ शकत नाही ” असे बेजबाबदार पणाने जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. उपरोक्त संघटनाचे , — तालुका पदाधिकारी, उपविभागीय समिती सदस्य, असताना सदरहू तलाठी वरील प्रमाणे कामात कसूर करून मागासवर्गीय यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवत आहेत. लोंढे यांची कागदपत्रे चौकशी करून रितसर नियुक्ती झालेली आहे का ?
लोंढे यांची नियुक्ती झालेल्या सजा वर वास्तव्यास राहतात की बाहेरगावी याबाबत चौकशी होऊन कारवाई व्हावी.
अवैद्य वाळू , मुरूम वाहतुकीला आपणासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी आळा घालण्यासाठी अहोरात्र परिश्रम व विविध उपाय राबवीत असताना मात्र लोंढे अवैध वाळू मुरूम वाहतूक करणारे ट्रॅक्टर डंपर यांना का अडवित नाहीत.

याबाबत चौकशी व्हावी.सदर कामी चौकशी होऊन लोंढे यांना निलंबित का करू नये ? याबाबतचा खुलासा मिळावा असे निवेदनाद्वारे कळविण्यात आलेले आहे. सदर निवेदनावर रिपब्लिकन पक्षाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष सुनील भाऊ खोकरे, एरंडोल तालुका सचिव देवानंद भाऊ बेहेरे, एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीणभाऊ बाविस्कर तसेच पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.