पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर एसटीला दररोज दंड, कारण धक्कादायक; आता चालकांच्या वेतनातून होणार दंड वसुली.

पुणे – मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर एसटीला दररोज दंड होत असून या दंडामागचं कारणही देण्यात आलं आहे. हा दंड एसटी चालकांच्या पगारातून कापण्यात येणार आहे.एखाद्या चालकाने वर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले, तर एसटी महामंडळ त्याच्या वेतनातून तो दंड वसूल करते. परिवहन विभागाकडून येणाऱ्या दंडावर वेळ व ठिकाण असते. त्यावरून त्या दिवशी व वेळी बस कोण चालवत होते, याची माहिती मिळते. त्यानुसार तो दंड चालकाच्या वेतनातून कापून घेतला जातो. तो परिवहन विभागाकडे भरला जातो, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
(एक्स्प्रेस वे) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वचक बसविण्यासाठी लावलेल्या कॅमेऱ्यांतून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस सुटलेल्या नाहीत. दररोज एसटीच्या एका बसवर नियमभंगाची दंडात्मक कारवाई (चलन) होत असल्याने वेगमर्यादा पाळण्यासह इतर नियमांचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना एसटी प्रशासनाने सर्व चालकांना दिल्या आहेत.

‘एक्स्प्रेस वे’ वरील अपघात कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तरीही अनेक वाहन चालक वेगमर्यादेचे उल्लंघन करतात.तसेच, मार्गिकेचे उल्लंघन करणे (लेन कटिंग), सीटबेल्ट न घालणे अशा प्रकारच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे.एसटी महामंडळाच्या पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या बहुतांश बससाठी ‘एक्स्प्रेस वे’ वरून धावतात. त्यामध्ये शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातील सर्वाधिक बस आहेत. परंतु, या बसच्या चालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने एसटीवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दररोज एका बसवर दोन ते तीन ठिकाणी नियमभंगाची कारवाई होत असल्याने एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सर्व चालकांना एक्स्प्रेस-वे वर नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

एसटी महामंडळाच्या पुणे विभागाप्रमाणेच इतर विभागाच्या अनेक बस एक्स्प्रेस वे वरून धावतात. त्यांच्या बसवरही दंड पडत आहे. त्यामुळे सातारा विभागाने त्यांचे एक पथक तयार करून, एक्स्प्रेस वे वर कोणत्या भागात वेगाची किती मर्यादा आहे याची माहिती संकलित केली. ती सर्व चालकांना दिली आहे. ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली.एखाद्या चालकाने एक्स्प्रेस वेवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले, तर एसटी महामंडळ त्याच्या वेतनातून तो दंड वसूल करते. परिवहन विभागाकडून येणाऱ्या दंडावर वेळ व ठिकाण असते. त्यावरून त्या दिवशी व वेळी बस कोण चालवत होते, याची माहिती मिळते. त्यानुसार तो दंड चालकाच्या वेतनातून कापून घेतला जातो. तो परिवहन विभागाकडे भरला जाती, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.