बदल्यांचे सत्र सुरूच, ७ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या.!

मुंबई : राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचा सपाटा अद्याप थांबताना दिसत नाही. गेल्याच आठवड्यात पाच अधिका-यांच्या बदल्या झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा सात आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यामध्ये रुसा प्रकल्प संचालक राजेंद्र भारुड यांची मुंबईतील उद्योग संचालनालयात अतिरिक्त विकास आयुक्तपदी बदली करण्यात आली, तर वरिष्ठ आयएएस अधिकारी निधी पांडे यांची लघुउद्योग खात्याच्या व्यवस्थापक संचालकपदी बदली करण्यात आली.

भारत बास्टेवाड यांची नागपूरमध्ये रोजगार हमी योजनेच्या ठिकाणी बदली करण्यात आली. लक्ष्मी नारायण मिश्रा यांची एमएसआरडीसीमध्ये सहाय्यक व्यवस्थापकपदी बदली करण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदुराणी जाखर यांची पालघरच्या जिल्हाधिकारीपदी तर नेहा भोसले यांची रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली.

डॉ. राजेंद्र भारुड यांची फेब्रुवारी महिन्यात ट्रायच्या आयुक्तपदावरून रुसामध्ये प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांत त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे उद्योग विभागाच्या अतिरिक्त विकास आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..