उत्तर प्रदेशसह देशभरात सध्या बुलडोझर कारवाई जोरात सुरु आहे. विशेषत: भाजपशासित राज्यांमध्ये बुलडोझर कारवाईनं जोर धरला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयानं याविरोधात भूमिका घेत राज्य सरकारांची कानउघाडणी केली आहे. उत्तर प्रदेशसह देशभरात सध्या बुलडोझर कारवाई जोरात सुरु आहे. विशेषत: भाजपशासित राज्यांमध्ये बुलडोझर कारवाईनं जोर धरला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयानं याविरोधात भूमिका घेत राज्य सरकारांची कानउघाडणी केली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील एक वकील, एक प्रोफेसर आणि तीन महिला याचिकाकर्त्यांच्या घरं २०२१ मध्ये बुलडोझरनं पाडण्यात आली होती. यावरुन सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या काळात अनेक ठिकाणी अवैध बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. या कारवाईचं अनुकरण भाजपची सत्ता असलेल्या अनेक राज्यांनी केलं आहे.










