होणारा नवरा नापसंत, लग्न करायचं नसल्यानं तरुणीनं दीड लाखांत सुपारी दिली; पुण्यात खळबळजनक घटना.

होणारा नवरा पसंत नाहीये, त्याच्यासोबत लग्न करायचं नाही म्हणून एका तरुणीने चक्क त्याला संपवण्यासाठी सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे तर तरुणी सध्या फरार आहे.होणारा नवरा पसंत नसल्याने त्याला थेट जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील सुपारी दिलेली तरुणी ही सध्या फरार आहे. आदित्य शंकर दांडगे, संदीप दादा गावडे, शिवाजी रामदास जरे, सुरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत.
जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांगडेचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम याच्यासोबत होणार होता.

मात्र, मयुरीला सागरसोबत लग्न करायचं नसल्याने त्याला जीवे मारण्यासाठी मयुरी दांगडे आणि संदीप गावडे यांनी तब्बल एक लाख ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार यवत पोलिसांच्या तपासात समोर आलाय.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर जयसिंग कदम याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती. कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील असणारा सागर कदम हा हॉटेल कुक म्हणून काम करतो. २७ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील खामगाव फाटा नजीक यवत पोलिसांच्या हद्दीत एका हॉटेलच्या परिसरात सागर कदम याला काही जणांनी रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली होती.

यानंतर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता यातील संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी यवत पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतलं असून आरोपींनी वापरलेली वेरणा कंपनीची पांढऱ्या रंगाची चार चाकी कार देखील ताब्यात घेतली आहे.मयुरी दांगडेला सागर कदम सोबत लग्न करायचे नव्हते, म्हणून तिने १ लाख ५० हजार रुपयांची सुपारी देऊन ही घटना घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.