रुग्णांचा नातेवाईक असल्याचा भासवायचा अन् गाडी गायब करायचा, कुख्यात चोराचा खेळ खल्लास, सापळा रचत अटक.

नागपूरात पोलिसांनी एका कुख्यात चोराला अटक केली आहे. ज्याच्याकडून तब्बल ७ दुचाकीसह इतर वाहने जप्त केली आहेत. रुग्णांचा नातेवाईक असल्याचे भासवून गाडी गायब करण्यास त्याने सुरु केली होती. त्याला पोलिसांनी सापळा रचत अटक केली.व्यसन भागविण्यासाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल परिसरातून दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या कुख्यात चोरट्याला अजनी पोलिसांनी सिनेस्टाइल सापळा रचून अटक केली. श्रीयांश ऊर्फ वैभव गंगाधर वरुडकर वय ४१ रा. रामकृष्णनगर,दिघोरी,असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. श्रीयांश याला दारूचे व्यसन आहे. ते भागविण्यासाठी तो वाहनचोरी करायचा.

श्रीयांश हा रुग्णाचे नातेवाइक असल्याचे भासवून परिसरातील विश्रामगृहात थांबून रात्री रुग्णाच्या नातेवाइकांसोबतच जेवायचा. संधी साधून वाहन चोरी करीत होता. एका आठवड्यात मेडिकलमधून दोन वाहने चोरी गेली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, उपनिरीक्षक सिद्धांत मस्के, हेडकॉन्स्टेबल ओमकार बाराभाई, नितीन सोमकुवर, अश्विन सहारे, नरेश श्रावणकर, मनीष भलमे, कुणाल उके व हिमांशू पाटील यांनी परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी केली. दोन्ही वाहने श्रीयांशने चोरी केल्याचे समोर आले.पोलिसांनी चौकशी केली असता तो विश्रामगृहात रुग्णाचा नातेवाइक असल्याचे भासवून थांबत असल्याचेही तपासात समोर आले. पोलिसांनी विश्रामगृहात सापळा रचला.

तो येताच पोलिसांनी श्रीयांशला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून मेडिकलमधून चोरी केलेल्या पाच वाहनांसह सात दुचाकी वाहने जप्त केली. चोरीची वाहने गहाण ठेऊन मिळालेल्या पैशातून दारूचे व्यसन भागवित असल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्याची पोलिस कोठडी घेतली आहे. त्याच्याकडून वाहन चोरीचे आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.नागपूर लोहमार्ग पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच एका बुलेटचोराला नाशिकवरुन अटक केली होती. त्या चोराने नागपूरमधील रेल्वे स्थानकाच्या जवळ पार्क केलेल्या बुलेटची चोरी केली होती या चोराला बुलेटचे आकर्षण असल्याने त्याने पार्किंगमध्ये पार्क असलेल्या बुलेटची बनावट किल्ली बनवली आणि बुलेट चोरली होती. पोलिसांना चोरीबद्दल माहिती न मिळावी म्हणून त्याने बुलेट नागपूरहून नाशिकला नेली होती. मात्र पोलिसांनी तपास केला आणि अवघ्या चोविस तासात त्या चोराला बेड्या ठोकल्या होत्या.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.