लिव्ह-इनमध्ये राहण्यास प्रेयसी तयार होईना, नायगावात प्रियकराने आयुष्य संपवलं, व्यथित तरुणीनेही दिला जीव.

मैत्रीण सोडून जाईल, या भीतीने जीतेंद्रला तिच्यासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहायचे होते. त्यासाठी तो तिला आग्रह करत होता. मात्र ती तयार नव्हती.‘लिव्ह-इन’मध्ये राहण्यास मैत्रिणीने नकार दिल्याने मित्राने आत्महत्या केली, तर त्याच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने या अल्पवयीन मैत्रिणीनेही आपले जीवन संपवल्याची घटना नायगाव  येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती.जीतेंद्र वर्मा (२४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या मुलीचे शिक्षण सुरू होते, तर जीतेंद्र हा एका खासगी कंपनीत कामाला होता. तो नायगाव पूर्वेच्या कोल्ही गावातील अरविंद चाळीत राहत होता.मैत्रीण सोडून जाईल, या भीतीने जीतेंद्रला तिच्यासोबत राहायचे होते. त्यासाठी तो तिला आग्रह करत होता.

मात्र ती तयार नव्हती. शनिवारी ती जीतेंद्रला भेटायला त्याच्या घरी गेली, याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर जीतेंद्र याने रात्रीच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.हा प्रकार त्याच्या मैत्रिणीला समजताच, आपणच मृत्यूला जबाबदार आहोत या भावनेने ती नैराश्यात गेली. तिच्या कुटुंबीयांनी तिची समजूत काढली. मात्र नैराश्यात गेलेल्या या मुलीनेही रविवारी दुपारी घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे नायगाव पोलिसांनी सांगितले.दुसरीकडे, दुचाकी चालविण्यावरून वाद होऊन मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली होती. पोलिस त्याच्या शोधात असताना आरोपीने सोमवारी कळमनुरी येथे झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

मनीष जयवंत शिरपुले (२३) रा. शेंबाळपिंप्री (पुसद) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. मनीष याची दुचाकी नादुरुस्त झाल्याने घरीच पडून होती. ही दुचाकी त्याचा लहान भाऊ दिनेश शिरपुले याने दुरुस्त करून वापरण्यास सुरुवात केली. दुचाकी वापरण्यावरून दोघाभावांचे रोज भांडण होत होते. यातूनच २८ मार्चला त्याने दिनेशची हत्या केली होती. नंतर तो फरार झाला होता. शोध घेण्यात आला असता त्याचा मृतदेहच आढळला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. वाढत्या गुन्हेगारीवरून चिंता व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.