महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी, एलपीजी सिलिंडर झाला; दिल्ली ते मुंबई​ LPG सिलिंडरच्या किमती जाणून घ्या.

आजपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे आणि पातेली महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडर आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती जाहीर झाल्या आहेत. ​IOCL दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमती जाहीर करते. देशातील चार महानगरांमध्ये घरगुती गॅस सिलिंडर आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती काय आहेत पाहूयानवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस सर्वसामान्यांसाठी दिलासा घेऊन आला आहे. राजधानी दिल्लीपासून ते मुंबई आणि चेन्नईपर्यंत देशातील सर्व महानगरांमध्ये गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एप्रिलच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमती सुधारित केल्या असून आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला तर दुसरीकडे, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती अजूनही ‘जैसे थे’च आहेत.घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत सलग ११ व्या महिन्यात कोणताही बदल झालेला नसून याआधी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मार्च २०२४ मध्ये शेवटची कपात झाली होती. देशातील चार महानगरांमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती काय आहेत जाणून घेऊया…

आज एप्रिल महिन्याचा पहिला दिवस आहे आणि दर महिन्याच्या पहिल्या दिवशी इंडियन ऑइल (IOC), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) सारख्या पेट्रोलियम कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी, इंडियन ऑइलकडून मिळालेल्या माहितीनुसार आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर म्हणजे १९ किलोच्या सिलिंडरच्या किमतीत कपात झाली आहे. IOCL च्या माहितीनुसार सर्व महानगरांमध्ये व्यावसायिक सिलिंडर ४० रुपयांनी स्वस्त झाला, जो गेल्या महिन्यात महागला होता.इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार, आज म्हणजे १ एप्रिल २०२५ पासून १९ किलोचा व्यवसायिक एलपीजी सिलिंडर दिल्लीत १७६२ रुपयांना असेल, जो याआधी मार्च महिन्यात १८०३ रुपये होती.

त्याचप्रमाणे, मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता १७१३.५० रुपये झाली, जी गेल्या मार्चमध्ये १७५५.५० रुपये होती.व्यवसायिक सिलिंडरचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांवर जास्त प्रमाणात होतो तर सर्वसामान्यांच्या घरात १४ किलोचा सिलिंडर वापरला जातो. आज, इंडियन ऑइलसह सर्व पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नसून मुंबईत घरगुती गॅस सिलिंडर ८०२.५० रुपयांना उपलब्ध आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल ९ मार्च २०२४ रोजी झाला होता. त्यावेळी, घरगुती सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची कपात झाली तर मार्चच्या आधी ऑगस्ट २०२३ मध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.