आई कॅन्सरशी झुंज देतेय. तिला होणारा त्रास तिचं कुटुंब अनुभवतंय. कुटुंबाकडून तिला या त्रासातून काढण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जात आहेत. या संघर्षात कुटुंबाची प्रचंड ससेहोलपट होत आहे. हे सारं दहावीचं शिक्षण घेणारी घरातील मुलगी पाहत आहे. ती सारं काही अनुभवत आहे. पण या भयानक अडचणीतून बाहेर निघायचं असेल तर शिक्षण आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुलगी प्रचंड जिद्दीने अभ्यास करते. ती इतका अभ्यास करते की, बोर्डात पहिली येते. यानंतर या विद्यार्थिनीने जी प्रतिक्रिया दिली ती खरंच काळजाल भिडणारी आहे. तिचं स्वप्न ऐकून आपल्यादेखील डोळ्यांत पाणी येईल.यशस्वी होणाऱ्या माणसांच्या पाठिमागे त्यांचा संघर्ष असतो. प्रत्येकाची एक भावनिक गोष्ट असते. ही भावनिक गोष्ट समाजालादेखील प्रेरित करत असते. बिहारच्या दहावीच्या बोर्डात पहिल्या आलेल्या विद्यार्थिनीचं वैयक्तिक आयुष्यदेखील खूप प्रेरणादायी आहे.










