सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांना केज पोलिसांनी तब्बल साडे तीन तास बसवून ठेवलं होतं.बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांना केज पोलिसांनी तब्बल साडे तीन तास बसवून ठेवलं होतं. पोलिसांना घटनेचं गांभीर्य माहीत असूनही त्यांनी निष्काळजीपणा दाखवला. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर देशमुखांचा जीव वाचला असता.९ डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं. टोलनाक्यावर त्यांची कार अडवण्यात आली. त्यानंतर देशमुखांना कारमधून बाहेर काढून मारहाण करण्यात आली. यानंतर आरोपींनी त्यांना स्वत:च्या कारमध्ये टाकून अज्ञातस्थळी नेलं. देशमुखांचं अपहरण झालं, त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीनं सगळा प्रकार देशमुखांचे बंधू धनंजय यांना सांगितला.










