बापरे! जामनेरमध्ये ट्रॅक्टरनं दहा ते बारा दुचाकींना उडवलं.

जामनेरमध्ये ट्रॅक्टरचा भीषण अपघात घडला आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरनं दहा ते बारा दुचाकींना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.जामनेर शहरातील वाकी रोड परिसरात हा अपघात घडला आहे.

या ठिकाणावरून जात असताना अचानक चालकाचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं, त्यानंतर अनियंत्रित झालेल्या ट्रॅक्टरनं या परिसरात पोस्ट ऑफिस तसेच बँकेबाहेर उभ्या असलेल्या दुचाकींना उडवलं, या घटनेत दहा ते बारा दुचाकींचं नुकसान झालं आहे.दरम्यान अपघात घडल्यानंतर चालक ट्रॅक्टर जोगेवरच सोडून पसार झाला. चालक दारूच्या नशेत असावा असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

या अपघातामध्ये दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे. दुचाकी मालकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानाची पाहाणी केली. ज्या वाहनांचं नुकसान झालं आहे, त्यांच्या मालकांची नावं लिहून घेण्यात आली आहेत. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे, त्याचा शोध सुरू असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती या अपघात प्रकरणात पोलिसांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.