जळगावमध्ये तरुणांसाठी इंटर्नशिपची सुवर्णसंधी! पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्हयात 261 संधी उपलब्ध.

जळगावमध्ये तरुणांसाठी इंटर्नशिपची सुवर्णसंधी! पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्हयात 261 संधी उपलब्ध. जळगाव-: महाराष्ट्र – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून, 21 ते 24 वयोगटातील तरुणांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 261 जागा उपलब्ध असून यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., रिलायन्स इंडस्ट्रीज लि., इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,

एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लि., बेअर क्रॉपसायन्स लि., बजाज फायनान्स लि., आदित्य बिर्ला फायनान्स लि., एचडीएफसी बँक लि., ज्युबिलंट फूडवर्क्स लि., मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लि., इंड्युसिंड बँक लि., बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि., डीसीएम श्रीराम लि. यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे.या योजनेसाठी 10 वी, 12 वी, आय.टी.आय. आणि पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी आणि 31 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत. उमेदवारांना दरमहा 5000 रुपये विद्यावेतन आणि इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर 6000 रुपये एकरकमी अनुदान मिळणार आहे. तसेच भारत सरकारकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण देखील मिळणार आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी: https://pminternship.mca.gov.in ला भेट द्यावी. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी तरुणांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.