नागपुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा जागता पहारा, शुक्रवार नमाजाच्या पार्श्वभूमीवर मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा.

नागपुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार नमाजानिमित्त शहरात अलर्ट मोडवर असल्याचे बघायला मिळाले आहे. नागपुरात बहुतांश मशिदींबाहेर आज कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय.नागपूरच्या  महल, हंसापुरी आणि भालदारपुरा या परिसरात 17 फेब्रुवारीला औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला होता. दरम्यान या घटनेला आज 5 दिवस उलटले असले तरी खबरदारी म्हणून पोलिसांनी काही भागात अद्याप संचारबंदी कायम ठेवत खडा पहारा तैनात करण्यात आला आहे. शहरतील नागपुरात दोन पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवली असून काही भागात 4 तास शिथिलता देण्यात आली आहे. तर हिंसाचार झालेल्या मध्य नगपूर भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी जैसे थे असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दुसरीकडे, नागपुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज (21 मार्च) शुक्रवार नमाजानिमित्त शहरात अलर्ट मोडवर असल्याचे बघायला मिळाले आहे.

नागपुरात बहुतांश मशिदींबाहेर आज कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. नागपुरात चौकाचौकात पोलिसांचा जागता पहारा पोलिसांकडून तैनात करण्यात आला आहे. अशातच अद्याप नागपुरात अजूनही काही भागात तणावग्रस्त स्थिती आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी या परिसरात काहीशी विशेष काळजी घेतली असल्याचे समजतंय. परिणामी, पुन्हा तणाव टाळण्यासाठी नागपूर पोलीस डोळ्यात तेल ओतून बंदोबस्तावर तैनात असून परिस्थिती हाताळत आहे.उपराजधानी नागपूर शहरात दोन गटांत उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटल्याचं पाहायला मिळालं.

औरंगजेबाची कबर हटविण्यावरुन झालेल्या आंदोलनानंतर दोन गटांत तेढ निर्माण होऊन जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत 34 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले असून सर्वसामान्य नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांकडून अद्यापही कारवाई सुरू असून या घटनेतली म्होरक्या किंवा मास्टरमाईंड फहिम खानला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या आहेत. अशातच नागपूर हिंसाचारानंतर छावा सिनेमावर बंदी घालावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या मौलानांकडून करण्यात आली आहे.नागपूर पोलिसांच्या हाती लागलेल्या चिथावणीखोर पोस्टमध्ये छावाविरोधात प्रचार करण्यात आल्याचेही सांगितलं जातंय. तर तणावाला कारण झाल्याचा आरोप करत ‘छावा’ सिनेमावर बंदीची मागणी केली जात आहे. दरम्यान यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे बंदीची मागणी ही केली जाणार असल्याचे सांगितलं जातंय. छावा सिनेमात सत्याशी फारकत घेतल्याचा पत्राद्वारे आरोप करण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.