नाशिकमध्ये आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू, अंगावर अनेक जखमा, अपघात की घातपात.

 नाशिकच्या पेठ तालुक्यातील रुई पेठा गावात आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. महिलेच्या अंगावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत.नाशिकच्या पेठतालुक्यातील रुई पेठा गावात आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. जखमी अवस्थेत महिलेला जिल्हा रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून महिलेच्या अंगावर अनेक जखमा असल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शोभा भिवसन या महिलेला जखमी अवस्थेत नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

महिलेच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या आहेत. ही लाकूड आणण्यासाठी घराबाहेर गेली होती, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. महिलेच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा असल्याने घातपात आहे की अपघात याविषयी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. महिलेचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकच्या पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. बांबूच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर आजूबाजूची काही दुकानांना देखील आग लागली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.