भारताची ताकद दुपट्टीने वाढणार! चीन-पाकिस्तानला धडकी, एटीएजीएस तोफांच्या खरेदीसाठी सात कोटींची मंजुरी.

लष्करासाठी हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारी विमाने, नौदलासाठी पाणतीर आणि इतर सामग्री खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. लष्करासाठी सात हजार कोटी रुपयांच्या प्रगत तोफांची खरेदी होणार आहे. या तोफा चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात केल्या जाणार आहेत. या खरेदीमुळे स्वदेशी लष्करी शस्त्रनिर्मितीला बळ मिळेल. लष्करासाठी हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारी प्रणाली असलेली विमाने, नौदलासाठी पाणतीर (टॉर्पिडो), टी ९० रणगाड्यांची इंजिने आदी सुमारे ५४ हजार कोटी रुपयांची सामग्री खरेदी करण्यास संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील लष्करी खरेदी समितीने मंजुरी दिली. विविध पातळ्यांवर या खरेदीला होणारा विलंब कमी करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही या समितीने निश्चित केली आहेत. एकूण आठ उपकरणांच्या खरेदी या मंजुरीद्वारे करण्यात येणार आहेत.लष्करासाठी ॲडव्हान्स्ड टोड आर्टिलरी गन सिस्टीम (एटीएजीएस) या प्रगत तोफांच्या खरेदीसाठी सात हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने मंजुरी दिली. या तोफा चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात केल्या जाणार आहेत.या खरेदीमुळे स्वदेशी लष्करी शस्त्रनिर्मितीला मोठे बळ मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. संरक्षण पुरवठा परिषदेने दोन वर्षांपूर्वीच या प्रस्तावाला प्राथमिक मंजुरी दिली होती. या करारान्वये ३२७ वाहक गाड्या (टोइंग व्हेइकल) आणि ३०७ तोफा लष्कराला पुरविण्यात येणार आहेत. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर या तोफा तैनात केल्यामुळे त्या विभागांतील संरक्षण सज्जतेला बळ मिळणार आहे. लष्कराची मारक क्षमताही वाढेल.या संदर्भात माहितगार सूत्रांनी सांगितले, की या तोफांमुळे स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना मिळेल. या तोफा संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आणि खासगी कंपन्यांनी मिळून विकसित केल्या आहेत. तोफांमधील सुमारे ६५ टक्के भाग देशातच उत्पादित करण्यात आले आहेत.

त्यामध्ये तोफांच्या नळ्या, मझल ब्रेक, दारूगोळा डागण्याची प्रणाली, दारूगोळा हाताळण्याची प्रणाली यांचा समावेश आहे. या तोफा सध्या कालबाह्य झालेल्या १०५ मिलिमीटर आणि १३० मिलिमीटरच्या तोफांची जागा घेतील.
या तोफांमधील प्रणाली दीर्घ कालीन उत्पादनाच्या दृष्टीने विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परदेशी घटकांवरील अवलंबित्व कमी होणार आहे. दिशादर्शक प्रणाली (नेव्हिगेशन), मझल व्हेलॉसिटी रडार आणि सेन्सर हे सर्व स्वदेशी आहेत

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.