“मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना” ही केवळ अफवा; फसवणुकीला बळी पडु नये जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे आवाहन.

“मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना” ही केवळ अफवा; फसवणुकीला बळी पडु नये जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे आवाहन.  “मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना” अशी योजना असल्याचे भासवुन समाजमाध्यमाव्दारे काही संदेश प्रसारीत होत आहेत. असे वृत्त केवळ अफवा असुन, नागरीकांनी त्यावर विश्वास ठेवु नये व फसवणुकीला बळी पडु नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी केले आहे.

या प्रकारच्या फसव्या संदेशा किंवा जाहिरातींमध्ये दिनांक ०१ मार्च २०२० नंतर दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यु झाला आहे व बालकांचे वय १८ वर्षापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील ०२ मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा ४ हजार रुपये मिळणार आहेत व त्यांचे फॉर्म तहसिल कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर अर्ज भरुन जिल्हा बाल संरक्षण कक्ष/जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असा मजकुर प्रसारित करण्यात येत आहे.

महिला व बाल विकास विभागाकडुन “मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना” अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसुन हा संदेश केवळ अफवा आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवु नये, याबाबत दक्षता बाळगावी. अशा अफवा असलेल्या सोशल मिडिया पोस्टवर विश्वास ठेवु नये. त्या प्रसारित करु नये असे आवाहन आर.आर. तडवी यांनी केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.