ड्रायव्हरच्या पायाखाली आग अन् काहीच वेळात संपूर्ण बस पेटली, बाहेर न पडू शकल्याने चौघे होरपळले, पुणे हादरलं.

 पुणे येथील हिंजवडी येथे एका मिनी बसला भीषण आग लागली. या घटनेत चौघांना होरपळून मृत्यू झाला आहे. तर पाचजण जखमी झाल्याची माहिती आहे.पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत टेम्पो ट्रॅव्हलर पूर्णपणे जळून खाक झाला आहे, तर चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हे चौघेही कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण १२ कर्मचारी या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखालीपुण्यात मिनी बसला भीषण आग, चौघांचा होरपळून दुर्दैवी अंत, अनेक जखमी, हिंजवडीतील घटनाअचानक आग लागल्याची घटना घडली आणि काहीच वेळात संपूर्ण टेम्पो ट्रॅव्हलरला आगीने घेरलं.हिंजवडी फेज १ येथे मंगळवारी (१९ मार्च) सकाळी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या या बसला भीषण आग लागली. यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झालेत. यापैकी दोघे हे ४० टक्के भाजले गेले आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेसातच्या सुमारास एचआयए कार्यालयाजवळ ही आग लागल्याची माहिती आहे.

व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या १२ ते १५ कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या या टेम्पो ट्रॅव्हलर बसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्यामुळे ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग लागताच समोरच्या भागात बसलेले कर्मचारी हे वेळीच बाहेर पडू शकल्याने त्यांच्या जीव वाचला आहे. मात्र, यापैकी चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या हिंजवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत.

गंभीर जखमींमध्ये चालकाचा समावेश असल्याची माहिती आहे.या मिनी बसला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र, ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. याबाबत अधिक माहितीसाठी आम्ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण सध्या काहीही माहिती मिळू शकलेली नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.