खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या लेकासह बापाचा दुर्दैवी अंत, एकत्रच अंत्ययात्रा पाहून सारे सुन्न.

एका घराचया पाडकामाचं काम सुरु होतं. तेवढ्यात हे संपूर्ण घर कोसळलं, त्यामुळे भिंतीखाली दबून दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. ज्यांचा मृत्यू झाला ते पिता-पुत्र होते.जुने घर बांधकाम पाडताना  जिल्ह्यातील चिखली तालुक्यात शेलोडी येथे दुर्दैवी घटना घडली. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेलोडी गावात जुने घर पाडण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अचानक संपूर्ण घरच कोसळले. या घटनेत वडील आणि मुलाचा भिंतीखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. सदर घटना सोमवार १७ मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली शालीकाराम वाळस्कर व योगेश वाळस्कर असे आहे.या घटनेबाबत सविस्तर घटनाक्रम शेलोडी येथील दामोदर घाडगे यांचे जुने घर पाडण्याचे काम सुरू होते. या कामावर शालिग्राम हरिभाऊ वाळस्कर (वय वर्ष ७०) व त्यांचा मुलगा योगेश शालिकराम वाळस्कर (वय वर्ष ३५), सुनील एकनाथ नेमाने (वय वर्ष ४०) व राम दिलीप घाडगे (वय वर्ष ३५) हे काम करीत होते.

काम सुरू असतानाच अचानक धाब्याचे घर कोसळले. यामध्ये शालिग्राम हरिभाऊ वाळस्कर व त्यांचा मुलगा योगेश वाळस्कर यांचा दबून मृत्यू झाला तर सुनील एकनाथ नेमाने आणि राम दिलीप घाडगे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दामोदर घाडगे यांचे जुने घर पाडण्यासाठी दिले होते. घर पाडताना सकाळी काम करत असताना सदर दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती अमडापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निर्मळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले.

शवविच्छेदनासाठी चिखली येथे पाठविण्यात आले. मृतक शालीकराम वाळस्कर यांच्या पश्चात पत्नी दोन मुले नातवंड असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने परिसरात एकच हळद व्यक्त केला जात आहे.सकाळच्या चहापाण्याची वेळ होती गावात शांतता होती. आदल्या दिवशी केलेले उर्वरित काम बाकी होते. अशातच शेतकरी पिता-पुत्र आणि इतर दोघांनी कामाला सुरुवात केली. पाहता-पाहता काही क्षणात काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि होत्याचं नव्हतं झालं. यामध्ये पिता-पुत्राचा मृत्यू झाला. दुपारी दोन वाजता पिता-पुत्राला एकाच वेळी मुखाग्नी दिल्याने प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. त्यादिवशी गावात चुलही पेटली नाही. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.