पोलिसांची मोठी कारवाई : बसमधून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलांना घेतले ताब्यात .

जिल्ह्यातील अनेक बस स्थानकावर असलेल्या प्रवाशांची पाकीट व सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटना नियमित घडत असताना आता अमळनेर पोलिसांनी बसमध्ये प्रवाशांचे सोने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या टोळीकडून चोरी केलेले सोनेही पोलिसांनी हस्तगत केले आहे. या कारवाईत अमळनेर पोलीसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीतील ३ लाख ६० हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगळ्या आणि मंगळसुत्र हस्तगत केले आहे. गंगा चैना हातगळे (वय ४०) आणि गंगा सुभाष नाडे (वय ४७, दोघी रा. यवतमाळ) असे अटक केलेल्या महिला चोरट्यांची नावे आहेत.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा जिजाबराव पाटील (वय ४८, रा. गारखेडे, ता. धरणगाव) यांनी दि.८ मार्च २०२५ रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ६ मार्च रोजी त्या धरणगावहून दोंडाईचा बसने नातेवाईकांच्या लग्नाला जात होत्या. त्यांच्या बॅगेतील सोन्याच्या बांगड्या आणि मंगळसूत्र चोरीला गेले होते. त्यांच्या शेजारी बसलेल्या दोन महिला अमळनेरच्या चोपडा नाका स्टॉपवर उतरल्या होत्या. त्यानंतरच चोरी झाल्याचे लक्षात आले.

या तक्रारीच्या अनुषंगाने, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि परी. पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्हा घडल्याचे वृत्त कळताच पोलीस पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. आरोपी महिला वरुड जि. अमरावती) येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून गंगा चैना हातगळे (वय ४०) आणि गंगा सुभाष नाडे (वय ४७, दोघी रा. यवतमाळ) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरी केलेले ३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या आणि ४ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.

आरोपी महिलांनी पोलिसांना चकमा देण्यासाठी जळगाव, अकोला, बार्शी टाकळी, परतवाडा, मध्य प्रदेशातील तिगाव, पांढुर्णा आणि इंदोर अशा अनेक ठिकाणी वास्तव्याची ठिकाणे बदलली. मात्र, पोलिसांनी चिकाटीने त्यांचा पाठलाग करून त्यांना वरुड येथील आठवडी बाजारात पकडले. या कारवाईत अमळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस हवालदार मिलिंद सोनार, पोलीस नाईक विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, निलेश मोरे, उज्वलकुमार म्हस्के, अमोल पाटील, गणेश पाटील आणि महिला होमगार्ड नीलिमा पाटील यांचा सहभाग होता. तसेच, नेत्रम कार्यालय जळगाव येथील पंकज खडसे, कुंदनसिंग बयस, गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी तांत्रिक मदत केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.