नागपुरात हिंसाचार, शहरात तणावपूर्ण शांतता, १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी, ८० जण अटकेत.

नागपुरात सोमवारी रात्री हिंसाचाराची मोठी घटना घडली. त्यानंतर नागपूरकरांची मंगळवारची सकाळी ही तणावपूर्ण वातावरणात झाली. सध्या नागपुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.औरंगजेबच्या कबरीवरून वाद  उफाळल्यानंतर नागपुरात हिंसाचाराची मोठी घटना घडली आहे. हंसापुरी भागातही हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. बुरखाधारी गुन्हेगारांनी गाड्यांची तोडफोड करत त्यांना पेटवून दिले. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीने कर्फ्यू लागू केला आहे.प्रत्यक्षदर्शींच्या मते, मोठ्या संख्येने आलेल्या हिंसक जमावाने महाल परिसरात तोडफोड आणि दंगल घडवून आणली. स्थानिक रहिवाशांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. काही दुकानांवर तलवारींनी हल्ला करण्यात आला. त्यानंतर हिंसाचार हंसपुरीपर्यंत पसरला, जिथे गुंडांनी वाहनांना लक्ष्य केले आणि त्यांना आगीच्या भक्ष्यस्थानी केले. हंसापुरीतील एका रहिवाशाने सांगितले, “अचानक एका टोळक्याने प्रवेश केला. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क किंवा दुपट्टे होते.

त्यांच्या हातात धारदार शस्त्रे आणि काठ्या होत्या. त्यांनी दुकानांवर आणि घरांवर हल्ले चढवले. गाड्यांमध्ये तोडफोड करून त्यांना पेटवून दिले.”हिंसेनंतर नागपूर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कलम १४४ लागू केले आहे, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक जमावावर बंदी घालण्यात आली आहे. महाल परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतिनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिल नगर या १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आला आहे.नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी सांगितले की, ” संचारबंदी पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल. तसेच हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.” याशिवाय, सायबर पोलिसांनी जवळपास १८०० सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी केली आहे. हिंसा भडकवणारा आक्षेपार्ह मजकूर आणि ५५ व्हिडिओ पोलिसांच्या रडारवर आहेत. यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. प्रशासनाने नागरिकांना खोटी माहिती आणि अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले असून, शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्यास सांगितले आहे.

हिंसाचारानंतर पोलीस सतत त्यामध्ये सहभागी लोकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याच्या कामात व्यस्त आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने हिंसाचारात सामील असलेल्या लोकांना पकडले जात आहे. आतापर्यंत नागपूर पोलिसांनी ८० जणांना अटक केली आहे आणि इतरांना पकडण्याचे काम सुरूच आहे. हिंसाचारानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध सुरू केला होता. घरातून शोधून काढून पोलिसांनी आरोपींना अटक केली.दरम्यान, महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले, “ही घटना पूर्वनियोजित असल्याचे दिसते. काही समाजकंटक नागपुरात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही कोणालाही माफ करणार नाही. पोलिसांवरही हल्ला झाला असून, आम्ही दोषींवर कठोर कारवाई करू.”संपूर्ण नागपूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असून, पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे .विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.