भयंकर! शिवीगाळ करतोय म्हणून टोकलं, तरुणानं चाकू हल्ला करतं शेजाऱ्यालाच संपवलं, आरोपी अटकेत.

शेजाऱ्याने एका महाविद्यालयीन युवकाला शिवीगाळ करत आहे म्हणून टोकलं तर त्या तरुणाने चाकू हल्ला करत शेजाऱ्यालाच संपवल्याची घटना नागपूरातून समोर येत आहे.महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत आहेत. शहरात हत्येची मालिका सुरूच आहे. दरम्यान, रविवारी सकाळी अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरपोडी येथे काही गुन्हेगारांनी एका तरुणाचा गळा चिरून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी रात्री नागपूरच्या धंतोली पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या राहुल नगर झोपडपट्टी परिसरात एका तरुणाला शिवीगाळ करण्यापासून रोखणे शेजाऱ्याला चांगलेच महागात पडले. रागाच्या भरात आरोपी तरुणाने चाकूने वार करून त्याची हत्या केली. ही घटना रविवारी रात्री घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतकाचे नाव अंकुश देवगिरकर (35) असे आहे, तर आरोपीचे नाव आयुष मंडपे (19) असून तो बीएससी प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आयुष आपल्या मित्रांसोबत दारू पिऊन झोपडपट्टीतील चौकात शिवीगाळ करत होता.

यावेळी तिथे आलेल्या अंकुशने त्याला शिवीगाळ करू नको असे सांगितले. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात अंकुशने आयुषची कॉलर पकडली. यामुळे संतापलेल्या आयुषने घरी जाऊन भाजी चिरण्याचा चाकू आणला आणि अंकुशवर थेट चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अंकुश गंभीररित्या जखमी झाला. त्या अवस्थेतच स्थानिकांनी अंकुशला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.हे वृत्त परिसरातील लोकांना कळताच अंकुशच्या मित्रांनी प्रचंड संताप व्यक्त करत आरोपीच्या घरावर तोडफोड केली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

धंतोली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आयुषला छत्रपती चौक परिसरातून अटक केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका १९ वर्षीय तरुणानं क्षुल्लक कारणाने शेजारच्याचा केलेला खून हे परिसरासाठी आणि शहरासाठी हादरवणार आहेवारंवार घडणाऱ्या हत्या आणि गुन्ह्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.