ज्ञानराधा घोटाळा प्रकरण: पतसंस्था कार्यालय, उपाध्यक्षांच्या ‎घरावर ईडीचे छापे; कागदपत्रे जप्त‎, मनी लाँड्रिंग केल्याने ईडीची एंट्री‎.

ज्ञानराधा घोटाळा प्रकरण: पतसंस्था कार्यालय, उपाध्यक्षांच्या ‎घरावर ईडीचे छापे; कागदपत्रे जप्त‎, मनी लाँड्रिंग केल्याने ईडीची एंट्री‎

बीड – ज्ञानराधा पतसंस्थेतून मोठ्या‎प्रमाणावर मनी लाँड्रिंग झाल्याचा‎संशय असून यासाठी मुंबईच्या‎ ८ अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी‎ बीडमध्ये ज्ञानराधा पतसंस्थेचे जालना ‎रोडवरील मुख्य कार्यालय, पतसंस्थेचे‎ उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांचे घर,‎सुरेश कुटे यांचे घर, त्यांचे कापड ‎दुकान या ठिकाणी तपासणी केली.‎ अतिरिक्त संचालक दर्जाचे अधिकारी‎त्यांचे प्रमुख होते. इतर ठिकाणांहून‎त्यांच्या हाती काही लागले नाही. मात्र‎पतसंस्थेच्या मुख्य शाखेतील‎संगणकातून पतसंस्थेचे खातेदार, ठेवी,‎ठेवीदारांची संख्या यासह इतर काही‎माहिती मिळाली आहे.‎

आठ अधिकाऱ्यांनी पाच तास केली तपासणी‎ ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणात‎आता सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) एंट्री झाली‎आहे. ज्ञानराधाच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग झाल्याने‎ईडीने शुक्रवारी सायंकाळी बीडमध्ये ज्ञानराधा‎मल्टिस्टेटचे मुख्य कार्यालय, उपाध्यक्ष यशवंत‎कुलकर्णी यांचे घर व सुरेश कुटे यांच्या घर, दुकानावर‎छापेमारी करून तपासणी केली. ८ अधिकाऱ्यांच्या‎पथकाने सुमारे पाच तास तपासणी करून मुख्य शाखेतून‎ज्ञानराधातील खातेदार, ठेवी, ठेवीदार याबाबतची‎माहिती त्यांनी घेतली आहे. बीडच्या आर्थिक गुन्हे‎शाखेची यासाठी मदत घेतली गेली.‎

बीड येथील कुटे ग्रुपवर नोव्हेंबर २०२३ मध्ये प्राप्तिकर‎विभागाने केलेल्या छापेमारीनंतर कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश‎कुटे अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेत‎ठेवी काढण्यासाठी ठेवीदारांनी गर्दी केली होती. यामुळे ‎‎पतसंस्था आर्थिक अडचणीत आली होती. ९ महिने ‎‎ठेवीदारांनी पैसे परत मिळण्याची वाट पाहिली. मात्र कुटे ‎‎यांनी केवळ आश्वासने दिली. अखेर ठेवीदारांनी ‎‎न्यायालयात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर गुन्हे नोंद‎झालेे. बीड जिल्ह्यातच ज्ञानराधा पतसंस्था प्रकरणात‎सुमारे ४१ गुन्हे नोंद आहेत, तर छत्रपती संभाजीनगर, ‎‎जालना जिल्ह्यातही गुन्हे नोंद आहेत. आर्थिक गुन्हे‎शाखेकडून याचा तपास केला जात आहे. दरम्यान, आता‎यात सक्तवसुली संचालनालयानेही कारवाई सुरू केली.‎ ज्ञानराधा घोटाळा ३ हजार ७१५ कोटींचा‎ ज्ञानराधा पतसंस्थेच्या राज्यात ५२ शाखा असून बीड जिल्ह्यात २२ शाखा‎आहेत. ज्ञानराधाप्रकरणी बीड जिल्ह्यात ४१ गुन्हे नोंद आहेत. पतसंस्थेच्या‎ठेवीदारांची संख्या १ लाख ६५ हजार ८७२ असून एकूण १७९० कोटी ०१ लाख‎३७ हजार ३३ रुपयांच्या ठेवी आहेत. ज्ञानराधा पतसंस्थेत एकूण ३ हजार ७१५‎कोटी ५९८ लाख ७२ हजार ६३३ रुपये अडकले आहेत.‎ ईडीच्या पथकाने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्याशी ‎संपर्क साधला. एपीआय गोविंद घोळवे, पीएसआय भारत बर्डे यांनी ईडीच्या पथकाला‎मदत करून सील काढले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर शाखा पुन्हा सील केली गेली.‎

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.