‘बाल हक्क संरक्षण आयोगा’च्या रडावर माजी आमदारांची शाळा पोलिसांसह प्रशासनाकडून मागविले अहवाल.

‘बाल हक्क संरक्षण आयोगा’च्या रडावर माजी आमदारांची शाळा पोलिसांसह प्रशासनाकडून मागविले अहवाल.

जळगाव : अमळनेर येथे मंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना उभे करण्यात आले होते. याप्रकरणी ‘नौरोजी बाल हक्क आयोग आपल्या दारी’ मधून आज (दि.९) सुनावणी झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी या प्रकरणी ताशेरे ओढले असून प्रशासन व पोलीस यांच्याकडून अहवाल मागविणात आले आहेत. त्यामुळे माजी आमदाराची शाळाही बाल हक्क संरक्षण आयोगाच्या रडावर आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग यांनी सुरू केलेल्या ‘बाल हक्क आयोग आपल्या दारी’ या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन या ठिकाणी जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी आज अनेक प्रकरणांची सुनावणी झाली. यात ४० प्रकरणे होती. यापैकी दहा ते बारा प्रकरणे आयोगाच्या सदस्यांनी तक्रारदार व व दुसरी बाजू ऐकून घेऊन निकाली काढले. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर, अॅड. प्रज्ञा खोचरे, चैतन्य पुरंदरे, विधी समन्वय प्रमोद बाडगे, माधवी भोसले, उज्वला आवडे, अजय लोंढे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक नखाते हे उपस्थित होते.

मंत्र्याच्या स्वागतासाठी माजी आमदार यांच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभा करण्यात आले होते. याप्रकरणी यावेळी सुनावणी घेण्यात आली. या बालहक्क आयोगाच्या सदस्यांनी ताशेरे ओढत पोलीस प्रशासन व प्रशासन यांच्याकडून तात्काळ अहवाल मागवण्यात आल्याचे सांगितले.

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून ‘बालहक्क आपल्या दारी’ या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन बालहक्क आयोग आपल्या दारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. तक्रारदाराला मुंबईकडे न येता त्यापेक्षा आयोगच आपल्या दारी या माध्यमातून सर्व तक्रारीवर सुनवाई व कारवाई होत आहे व मुलांना व त्यांच्या हक्कांना संरक्षण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे माध्यमांशी बोलताना बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर म्हणाल्या.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.