कबरीचा वाद, नागपुरात हिंसाचार; जमावाचा पोलिसांवर वार, DCP निकेतन कदम गंभीर जखमी.

नागपुरात सोमवारी हिंसाचाराची मोठी घटना घडली आहे. यावेळी जमावाने दगडफेक आणि जाळपोळ केली. यामध्ये एकाने डीसीपी निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे.नागपुरात दोन गटात तुफान राडा झाल्यानंतर सध्या शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. नागपुरातील महाल परिसरात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास औरंगजेबच्या कबरीच्या वादातून नागपूर शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. महाल परिसरात दोन गटांमध्ये तणाव वाढला आणि त्यानंतर अचानक जमावाने हिंसाचार सुरू केला. या घटनेत जमावाने दगडफेक करत जाळपोळही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं.या हिंसाचारात अनेक पोलीस जवान जखमी झाले असून, नागपूरचे पोलीस उपायुक्त (DCP) निकेतन कदम यांच्यावरही हल्ला करण्यात आला. ज्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जमावातील एका व्यक्तीने त्यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार केला.

या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.सोमवारी (१७ मार्च) संध्याकाळच्या सुमारास महाल परिसरात दोन गटांमध्ये औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून तणाव निर्माण झाला. काही वेळातच वाद विकोपाला गेला आणि जमावाने दगडफेक सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, संतप्त जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवत जाळपोळ सुरू केली. या घटनेनंतर शहरात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधूर निघाळले. हिंसाचारात सहभागी असलेल्या काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

औरंगजेबाची कबरीचा मुद्दा, नागपूरमध्ये दोन गटात राडा, मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
सध्या नागपूर पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली असून शहरात शांतता राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागपूर पोलीस आयुक्तांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या हिंसाचारात सामील असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या जखमेवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.