शिवसेना संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी विधान परिषदेवर नंदुरबारात आनंदोत्सव; ढोल ताशांच्या गजर, फटाक्यांची आतिषबाजी.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर नंदुरबारात समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी आणि एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शिवसेना संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी विधान परिषदेसाठी प्रबळ दावेदार होते. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री,पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडगावचा प्रचार सभेत चंद्रकांत रघुवंशी यांना आमदार करण्याचे जाहीर केले  होते.दरम्यान,विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यामुळे ती जागा रिक्त झाली होती.

३ आठवड्यांपूर्वीच विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाला. त्यात शिवसेनेच्या वाट्याला १ जागा होती. या जागेसाठी अनेक जण इच्छुक होते. शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशींना उमेदवारी दिली. सोमवारी सकाळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नंदुरबारात सेना भवन परिसरात समर्थकांनी जल्लोशोत्सव साजरा केला.सकाळी ११ वाजता सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी जमा झाल्यानंतर सेना भवन परिसरात ढोल ताशांच्या गजर अन फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे शिवसैनिकांनी एकमेकांना पेढा भरवला. जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी,जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील,शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, माजी सभापती कैलास पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव मोरे,माजी जि.प सदस्य देवमन पवार,किरण रघुवंशी, कुणाल वसावे,गजेंद्र शिंपी, रवींद्र पवार,पत्रकार हिरालाल चौधरी,किशोर पाटील, नवीन बिर्ला,मोहितसिंग राजपूत,जगन माळी, किरण चौधरी, विजय माळी यांनी जल्लोशोत्सवात सहभाग घेतला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.