आमचे हे दिसले का? पोरं वाट पाहतायत… पती १० महिन्यांपासून घरातून बेपत्ता, मुंबईला येणाऱ्या ट्रेनमध्ये ३८ वर्षीय विवाहितेचा आर्त प्रश्न.

आठ ते दहा महिन्यांपासून घरातून निघून गेलेल्या आपल्या पतीचा शोध घेण्यासाठी बिहारमधील ३८ वर्षीय कृष्णाकुमारी गेले काही महिने मिळेल त्या रेल्वेने, सापडेल त्या दिशेने सैरभैर भटकंती करीत आहे. कुठल्यातरी रेल्वे स्थानकात, कोणत्या तरी गाडीच्या जनरल डब्यात ‘ते’ नक्की सापडतील, मी त्यांना घरी घेऊन जाईल, पोरं आमच्या दोघांची वाट पहात दारात बसले असतील… हे तिचे शब्द ऐकून रेल्वेतील सहप्रवाशांना गलबलून येत नसेल तरच नवल!विविध राज्ये, प्रदेश ओलांडून कधी तिकीट काढून तर कधी पैशांअभावी ‘सरकारी पाहूणी’ बनत कृष्णाकुमारीची स्वयंघोषित शोध मोहीम सुरू आहे. रविवारी (दि. १६) मुंबईकडे जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ‘आपने इनको कहीं देखा क्या?’ असे विचारीत ‘आपमेंसे कोई मेरे पती को ढूंड देंगे क्या?’ अशी आर्त गळ ती प्रवाशांना घालीत होती.

रडून लाल झालेले डोळे व चेहऱ्यावर कमालीची अगतिकता पाहून तिला भेटणाऱ्या प्रत्येकाला जणू आतून गलबलून येत होते. हातात नवऱ्याचा फोटो घेऊन तिची कथा व व्यथा ती मुंबईपर्यंतच्या प्रवासात सर्वांना ऐकवत असल्याचे दिसून येत होते.कृष्णाकुमारी पती ओमप्रकाश अचानक बिहारमधील कुठल्यातरी खेड्यातून अचानक बेपत्ता झाला. पोलिस ठाण्यात तक्रार दिली गेली. तपासही झाला,पण तो घरी परतला नाही. दोन छोटी मुले ‘पप्पा घर कब आएंगे’ असे विचारून भंडावून सोडत आहेत. वृद्ध सासू-सासरे आपल्या तरुण पोराच्या येण्याकडे डोळे लावून बसले आहेत. लाडक्या मुलांना आजी आजोबांकडे सोपवून ‘मेरा घर वापस रोशन होगा’ या आशेवर तिची भटकंती सुरू आहे.ती कधी तिकीट काढून रेल्वेत बसते, तर अनेकदा पैशाअभावी तिला विनातिकीट प्रवास करावा लागतो. रेल्वेतील तिकीट तपासनीस कधी तिला अडवतात, शिक्षा, दंड करण्यासाठी सरसावतात, तर कधी तिच्या डोळ्यातील आसवे पाहून काळ्या कोटातील माणुसकी तिच्या मदतीसाठी पुढे सरसावते. पोलिसही जमेल तशी मदत करतात.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.