‘बरं झालं पक्ष फुटला, जो पुरूष स्वत:च्या बायकोच्या…’; सुप्रिया सुळे धनंजय मुंडेंबाबत ऑफ द रेकॉर्ड सर्वकाही बोलल्या.

शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये सुप्रिया सुळे पक्षाच्या बैठकीमध्ये कार्यकर्यांशी बोलताना, पहिल्यांदा धनंजय मुंडेंबाबत मनातल उघडपणे बोलल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांचे निकटवर्तीय असणाऱ्या वाल्मिक कराड याचे पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये नाव आल्यावर त्यावेळी देशमुखांचे फोटोही व्हायरल झाले. राज्यभरात संतापाची लाट उसळली, त्यानंतर अधिवेशन तोंडावर असताना मुंडे यांनी राजीनामा दिला. अजित पवारांचे जवळचे असलेल्या मुंडेंविरोधात अनेक आरोप केले. कृषी खात्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अशातच शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदा धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधला. पुण्यात पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये त्या बोलत होत्या. यादरम्यान बोलत असतानाची त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये शेती खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला त्याचा उल्लेख राष्ट्रवादीच्या आमदारांनी केला. संतोष भाऊच्या आईला बायकोला भेटा, महादेव मुंडेच्या बायकोला भेटा. त्यांच्याकडे मुलाला लेकरू बोलतात. माझ्या लेकराची यात काय चूक याचं उत्तर द्या, असं मला महादेव मुंडेच्या बायकोने मला विचारलं. संतोष देशमुखांच्या आईने माझा हात धरला आणि मला न्याय देणार असा शब्द दे सुप्रिया, मी शब्द देऊन आले, मला कधी-कधी वाटतं, बरं झालं पक्ष फुटला. ते तर या पक्षात असते तर मी पक्षात राहिले असते तर आमच्यातील एकच कोणतरी पक्षात राहिलं असतं. सगळ्या दुनियेला माहिती आहे. माझी लढाई ते पक्षात असतानाही होती, मी बाहेर कधी बोललेली नाही. जो पुरूष स्वत: पत्नी जी मुलांची आई असलेल्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरूषासोबत मी काम करणार नाही. तेव्हापासून लढाई सुरू झाली, मी आज पहिल्यांदा गोष्ट बोलले आणि आता माईकवर बोलेल कोणाला घाबरणार नाही कारण मी असली फालतू लढाई करत नाही. विरोधी पक्षात आयुष्य घालवेल पण नैतिकता सोडणार नाही. मला नकोयेत कॉन्ट्रॅक्टरचे ते पैसे, माझं घर काही कॉन्ट्रॅक्टरच्या पैशावर चालत नाही.धनंजय मुंडे यांचे नाव घेतले नसले तरी सुप्रियाताईंचा रोख त्यांच्याकडेच होता. धनंजय मुंडेंबाबत केलेले वक्तव्य सर्वत्र व्हायरल झाले आहे. यावेळी बोलताना सुळे यांनी सहा महिन्यात आणखी एक विकेट जाणार असल्याचा दावा केला आहे. नेमका कोण आहे तो मंत्री याचे नाव त्यांनी घेतले नाही मात्र यासंदर्भात त्यांची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.