भरधाव वेगात येत समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक, त्याचा एक निष्काळजीपणा अन् दोघांचा जीव गेला, नंदुरबार हळहळलं.

नंदुरबार येथे भरधाव वेगात असलेल्या दोन दुचाकी एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी झाला आहे.भरधाव दुचाकी समोरासमोर धडकल्याने दोन जागीच ठार तर एक जण गंभीर झाल्याची दुर्दैवी घटना नंदुरबार दोंडाईचा रस्त्यावर असलेल्या काठोबा चौकीजवळील मारुती मंदिराजवळ घडल्याची घटना १५ मार्च रोजी दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथे राहणारे दिलीप सुरेश ठाकरे (वय ४४) हे ट्रक चालक म्हणून कामाला होते. दरम्यान तो ट्रक नादुरुस्त असल्याने दुरुस्तीसाठी धुळे येथे गॅरेजमध्ये लावण्यात आला होता. ट्रकची पाहण्यासाठी धुळे येथे दुचाकीने (क्र.एम.एच.३९ ए.एम ६९४८) गेले होते. ते नंदुरबारकडे परतत होते.

यावेळी नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील काठोबा देवस्थानाजवळील मारुती मंदिराजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वार कल्पेश शंकर ठाकरे (वय २६ ) रा. फत्तेपूर ता. शहादा याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र. एम.एच. १८ ए.पी ०८२४) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालविल्याने दिलीप ठाकरे यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.अपघातात दिलीप ठाकरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर कल्पेश ठाकरे याच्या पाठीमागे बसलेला सचिन शिवा पवार (वय २० ) रा. विरपूर ता. शहादा याचाही गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाल्याची घटना. अपघात झाल्यानंतर माहिती मिळताच नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग परदेशी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी गंभीर जखमींना जिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सचिन पवार व दिलीप ठाकरे यांना मयत घोषीत केले.

या अपघातात कल्पेश ठाकरे याला भीषण दुखापत झाल्याने त्याला सुरत येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी रणजित सुरेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात कल्पेश ठाकरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग परदेशी करीत आहेत.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.