नो पाटील, नो देसाई, आता फक्त…; सरपंच हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय.

 सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्हा राज्यभरात चर्चेत आला. या संपूर्ण प्रकरणाला पुढे जातीयवादाचा रंग मिळाला. देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा विषय भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी सातत्यानं लावून धरला.बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्हा राज्यभरात चर्चेत आला. या संपूर्ण प्रकरणाला पुढे जातीयवादाचा रंग मिळाला. देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा विषय भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी सातत्यानं लावून धरला. बीड जिल्ह्याच्या पोलीस दलातील बिंदू नामावलीचा मुद्दा धस यांनीच उपस्थित केला होता. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला. जिल्ह्यातील पोलीस दलात एकाच जातीचं वर्चस्व असल्याचं धस यांनी सांगितलं होतं. पोलीस दलातील अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मर्जीतील असल्याचा विषयदेखील धस यांनीच समोर आणला.

बीड पोलीस दलातील जातीवादाचा विषय ताजा असताना पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीडमध्ये पोलिसांच्या नेमप्लेटवर केवळ नाव असेल, आडनाव नाही, असा निर्णय काँवत यांनी घेतला आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांवरदेखील जातीवादीचे आरोप झाले. त्यानंतर बीड पोलीस अधीक्षकांनी हे पाऊल उचललं आहे. नेमप्लेटवरील आडनाव काढून टाकल्यानं कोणता कर्मचारी कुठल्या जातीचा आहे हे लक्षात येणार नाही, हा यामागचा हेतू आहे.खाकी घातल्यानंतर जिल्ह्यामध्ये काम करताना आम्ही कुठलाही भेदभाव करत नाहीत. कुठली जात आहे, कुठला पक्ष आहे, हे आम्ही पाहत नाहीत कायद्याप्रमाणे आम्ही काम करतो, असं पोलीस अधीक्षक काँवत यांनी सांगितलं. ‘आमच्या विभागातील कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांची आडनावं बघून लोक जातीबद्दल चर्चा करतात. आमची नेमप्लेट पाहून जनता आमच्यावर विश्वास ठेवत नाही. आम्ही चांगलं काम करत असूही नेमप्लेटवरील आडनाव पाहून त्यावरुन जात शोधली जाते. त्यामुळे खाकी गणवेशावरील नेमप्लेटमधून आम्ही आडनाव काढून टाकलं आहे. फक्त नाव ठेवलेलं आहे. यामुळे हा पोलीस या जातीचा आहे अशी शंका आता घेता येणार नाही,’ अशा शब्दांत काँवत यांनी नेमप्लेटवरुन आडनाव काढून टाकण्यामागील आपला हेतू सांगितला.सर्व जनता आम्हाला समान आहे. आम्ही कुठला पक्ष, जात पाहत नाही. कायद्याप्रमाणे आम्ही काम करतो. त्यामुळे आम्ही सर्व पोलिसांना पहिलं नाव असलेली नेमप्लेट दिलेली आहे. पोलिसाचं आडनाव बघून तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीचं मत परिवर्तन होऊ नये यासाठी आम्ही केवळ पहिलं नाव असलेली नेमप्लेट दिली आहे, अशी माहिती काँवत यांनी दिली. आम्ही निष्पक्षपणे लोकांना सेवा देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.