जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाचे माजी नगरसेवक रुपेश माळी, युवासेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन, उप-तालुकाप्रमुख युवासेना अनिल महाजन, शहरप्रमुख अजय महाजन तसेच त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
तसेच परभणी जिल्ह्यातील उबाठा गटाच्या महिला जिल्हाप्रमुख सखुबाई लटपटे, उपजिल्हाप्रमुख सुनीता घाडगे, गंगाखेड तालुक्यातील शारदा वावळे, पुणे जिल्हा उबाठा जिल्हाप्रमुख नीता भोसले, लक्ष्मी माने यांनीही भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, एरंडोलचे आमदार अमोल पाटील, माजी खासदार ऍड.सुरेश जाधव, परभणी जिल्हा पक्ष निरीक्षक सुभाष साळुंखे, शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.









