महिला वाहकाचा आगार व्यवस्थापकाकडून विनयभंग; सहा महिने उलटून कारवाई नाही, पीडितेवर उपोषण करण्याची वेळ.

शेगाव आगारातील महिला वाहकाचा आगार व्यवस्थापकाने विनयभंग केल्याची घटना घडलीय. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाला सहा महिने उलटूनही आद्याप आरोपींवर कारवाई केलेली नसल्याचा प्रकार समोर आलाय.बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगारातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात आगारातील महिला वाहकाचा आगार व्यवस्थापकाने विनयभंग केल्याची घटना घडलीय. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाला सहा महिने उलटूनही आद्याप आरोपींवर कारवाई केलेली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. परिणामी पिडीत महिला वाहाकाने शेगाव बस स्थानकासमोर गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू करत आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ही या निमित्याने चर्चेत आला आहे.पुढे आलेल्या माहितीनुसार, ‘माझी मागणी पूर्ण केली तर तुला मनाप्रमाणे ड्युटी मिळेल…!” असं म्हणत या आगार व्यवस्थापकाने या महिला वाहकाचा विनयभंग केला आहे.

याप्रकरणी शेगाव पोलीस स्थानकात 21 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हाही दाखल झाला. मात्र सहा महिने उलटून ही या प्रकरणातील चार आरोपींवर कुठलीही कारवाई पोलिसांनी अथवा राज्य परिवहन महामंडळाने न केल्याने या महिलेने नागपूर उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने आरोपींवर कारवाई करण्याचे निर्देशही पोलीस अधीक्षकांना दिले. मात्र तरीही आरोपींवर कारवाई न झाल्याने पीडित महिला वाहकाने शेगाव बस स्थानकासमोर उपोषण सुरू केल आहे.गेल्या आठ दिवसापासून हे उपोषण सुरू आहे.

मात्र आरोपींवर ही कारवाई तर सोडाच पण या महिलेच्या उपोषणाची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे महिला कर्मचाऱ्यांच्या बाजूने साक्ष देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या प्रमोद पोहरे या कर्मचाऱ्यालाही महामंडळाने निलंबित केलंय. त्यामुळे अद्यापही पीडित आरोपींवर कारवाई होण्याची वाट बघत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.