दिवसभर रस्त्याचं काम केलं ,रात्री पुलाजवळच झोपी गेले, अज्ञात वाहनांची धडक अन्.

जळगावात रस्त्याचे काम करुन रात्री पुलाजवळ झोपलेल्या मजुराचा दुर्देवी अंत झाल्याची घटना समोर येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.सोमवारी रात्री जळगाव खुर्द जवळ तीन परप्रांतीय तरुण एका लोखंडी पट्टीवर झोपले असता त्यांना अज्ञात वाहनाने मध्यरात्री चिरडले. ही घटना सकाळी मंगळवारी उघडकीस आली. जळगाव तालुक्यातील नशिराबादगाव जवळील जळगाव खुर्द गावाच्या पुलाजवळ रात्री तीन परप्रांतीय तरुण लोखंडी पट्टीवर झोपलेले असताना अज्ञात वाहनाने तिघांना एकाच वेळी चिरडल्याची धक्कादायक बाब मंगळवारी ११ मार्च रोजी सकाळी उघडकीला आली.घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहेत.नशिराबाद गावाच्या पुरढ असलेल्या जळगाव खुर्द गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला रोडचे काम सुरू आहे. या ठिकाणी मजूर काम करत असतात. रस्त्याच्या शेजारी असलेल्या पुलावर ते झोपले होते.

मजूर झोपलेले असताना अंधारात काही न दिसल्याने अज्ञात वाहनाने तिघांना जागेवरच चिरडले असल्याचे निदर्शनास येत आहे. हे तीनही मजूर परप्रातांतून आले होते.ही दुर्देवी घटना मंगळवारी ११ मार्च रोजी सकाळी ७वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याघटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी पोहचले. यासंदर्भात नशिराबाद पोलीसठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.उसतोड कामगांराचा ट्रक उलटला, ६ कामगारांचा मृत्यूजळगावमध्ये झालेल्या दुर्देवी घटने अगोदर छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारीच ट्रक उलटल्याने त्यातील उसाच्या मोळ्याखाली दबून ६ उसतोड कामगारांचा मृत्यू झाला होता.

या अपघातात ११ मजूर हे जखमी झाले होते.उसाचा ट्रक भरल्यानंतर वाहनाने गावाकडे जाणार होते मात्र त्यांना दुसरे वाहन उपलब्ध न झाल्याने त्यांनी त्या ट्रकमध्येच बसून प्रवास सुरू केला.पिशोर ते कन्नड या मार्गातील घाटात ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटला. त्यात ५ कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. इतर कामगारांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.