जिल्हा युवा पुरस्कार सन 2023-24 व 2024-25 साठी 27 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा युवा पुरस्कार सन 2023-24 व 2024-25 साठी 27 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन  राष्ट्र व राज्य निर्माणमध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग /संख्या राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्याहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याचे युवा धोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार नुसार देण्यात येतात. सन 2023-24 व 2024-25 या दोन वर्षातील जिल्हा युवा पुरस्कार आपल्या जिल्ह्यातील १ युवक, १ युवती व १ नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत. या जिल्हा युवा पुरस्काराचे स्वरुप युवक/युवती यांना रोख रु. 10,000/- नोंदणीकृत संस्थेस रु. 50,०००/- तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे.

जिल्हा युवा पुस्कारासाठी युवक/युवती अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्था यांची 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील गत तीन वर्षामध्ये (म्हणजेच 2023-24 या वर्षीसाठी अर्जाचे मुल्यांकन करताना 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2024 तर 2024-25 या वर्षीसाठी अर्जाचे मुल्यांकन करताना 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील कार्य ग्राह्य धरले जाईल ) केलेल्या कामगिरीचे मुल्याकंन विचारात घेण्यात येणार असून जिल्हा युवा पुरस्कार सन 2023-24 व 2024-25 साठी अर्ज दि. 27 मार्च 2025 रोजी पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक/ युवती व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्था यांनी पुरस्कारासाठी विहीत नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केलेले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.