रत्नापिंप्री ग्रा.पं कडून रक्तदान शिबिर. पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील रत्नापिंप्री तालुका पारोळा ग्रुप ग्रामपंचायत मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे आयोजन व जीवन ज्योती ब्लड बँक अमळनेर धुळे यांच्याकडून करण्यात आले होते यावेळी रत्नापिंप्री,होळपिंप्री,दबापिंप्री येतील असंख्य तरुण मंडळींनी रक्तदान करून सेवा केली या शिबिरात सरपंच, उपसरपंच अधिकार पाटील माजी उपसरपंच अंकुश भागवत रत्ना पिंपप्री पोलीस पाटील प्रभाकर पाटील.
विविध कार्यकारी सोसायटी सचिव सुनील पाटील संजय पाटील गावातील नागरिक अधिकार पाटील यांनी रक्तदान केले या शिबिरासाठी गावातील संदीप पाटील, भाऊसाहेब पाटील यांनी परिश्रम घेतले रक्तदान हेच श्रेष्ठ दान









