रत्नागिरीतील चिमुकलीचा गोव्यात नरबळी? मुलगी आधी बेपत्ता, नंतर गाडलेल्या स्थितीत समोर; परिसरात खळबळ.

गोव्यात पाच वर्षीय चिमुकलीचा जमिनीत गाडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पूर्वी रत्नागिरीत राहत असलेल्या चिमुरडीचा गोव्यात जादूटोण्यासाठी नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करणारा धक्कादायक, संतापजनक घटना प्रकार गोव्यात घडला आहे. बेपत्ता ५ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह घराच्या बाजूलाच गाडलेल्या स्थितीत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. कसलये-तिस्क फोंडा येथे हा प्रकार उघडकीस आला आहे.घराच्या बाजूला मुलीचा मृतदेह जमिनीत गाडलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलीचे नाव अमेरा ज्युडान अन्वारी (वय ५) असे असून, ज्या घराशेजारी हा मृतदेह गाडलेल्या स्थितीत होता, त्या घराच्या मालकाला पत्नीसह फोंडा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घराच्या बाजूलाच या मुलीला मारून पुरल्याचे अलाट नावाच्या या पती-पत्नीने कबूल केले. त्यामुळे संशयित पप्पू ऊर्फ बाबासाहेब अलाट आणि त्याची पत्नी पूजा अलाट या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केल्या असून हा जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकालाही पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली आहे. चिमुकलीचा खून करण्यात आला की नरबळी याचे गूढ अद्याप कायम असून पोलीस तपास करत आहेत.पोलिसांनी हा प्रकार खुनाचा गुन्हा म्हणून नोंद केला असून, पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान, हा जादूटोण्याचा प्रकार असल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. कसलये-तिस्क येथील अमेरा अन्वारी ही चिमुरडी काल शनिवारी सकाळपासून बेपत्ता होती. यासंबंधी फोंडा पोलीस स्थानकात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.मात्र, ही मुलगी आपल्या आईसह राहत असलेल्या घरासमोरील सुमारे ५० मीटर अंतरावरील अलाट कुटुंबीयाच्या घरी ये-जा करत होती म्हणून पोलिसांनी अलाट पती-पत्नीकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

घराच्या बाजूलाच या मुलीला मारून पुरल्याचे अलाट पती-पत्नीने कबूल केले. त्यामुळे संशयित पप्पू ऊर्फ बाबासाहेब अलाट व त्याची पत्नी पूजा अलाट या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी आणि अलाट कुटुंबीय परप्रांतीय असून मागील अनेक वर्षे गोव्यात राहत आहेत. पप्पू आणि त्याची पत्नी पूजा या दांपत्याला मूलबाळ नाही. त्यामुळे मूलबाळ होण्याबरोबरच समृद्धी मिळावी, या हेतूनेच हा ‘नरबळी’ दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अमेरा बुधवारी सकाळपासून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.