शेतकरी संघटना जळगाव च्या वतीने विविध मागण्यांसाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांती मोर्चा.

स्व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना जळगाव च्या वतीने विविध मागण्यांसाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांती मोर्चापारोळा पोलीस स्टेशन द्वारे जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव यांना निवेदनपारोळा प्रतिनिधी ; वाल्मीक पाटील जळगाव जिल्ह्यातून ठिबक, तुषार संच, अनुदान ,पिक विमा ,अतिवृष्टी ,संपूर्ण कर्जमाफी, नारपार नदी जोड योजना, यासंदर्भात शेतकरी क्रांती मोर्चा जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचे रखडलेले विविध प्रश्न 9 ऑगस्ट क्रांती दिन स्व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना जळगाव संघटनेच्या माध्यमातून मांडणार आहे 2023-2024 चे शासनाकडे ठिबक तुषार सिंचन चे 32 हजार 402 शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार संच बसवले परंतु आज तागायत शेतकऱ्यांना 188 कोटी रुपये या अनुदानाचा सबसिडीचा लाभ मिळालेला नसून शेतकरी वाऱ्यावर दिसून येत आहेत तसेच या सबसिडीचा लाभ त्वरित देण्यात यावा , जळगाव जिल्ह्यात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना मागील वर्षाचा पिक विमा पूर्णपणे मिळवून द्यावा व शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रक्कम लवकर अदा करण्यात यावी,शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, जळगाव जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या व फेब्रुवारीमध्ये झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट चे थकीत अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर लवकरात लवकर तात्काळ स्वरूपात जमा करण्यात यावी,यासाठी जळगाव येथे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचा शेतकरी क्रांती मोर्चा धडकणार असून जिल्ह्यातील शेतकरी बंधू तसेच शेतकरी संघटना जिल्हाधिकारी जळगाव तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात येणार आहे , शेतकरी संघटना 9 ऑगस्ट रोजी शुक्रवार सकाळी 11 वाजता जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते स्टेट बँक बस स्टॅन्ड मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोर्चा घेऊन जिल्हाधिकारीसो , कृषी अधीक्षक जळगाव यांना निवेदन देणार आहेतयासंदर्भात पोलीस स्टेशन पारोळा याद्वारे पोलीस अधीक्षक जळगाव ,जिल्हाधिकारी जळगाव तसेच जिल्हा कृषीअधीक्षक जळगाव याबाबतीत निवेदन दिलेयावेळी स्व, शरद जोशी, प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील , तालुकाध्यक्ष प्राध्यापक, भिकनराव पाटील, सचिव गुलाबराव पाटील छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, संघटक गुलाब वाघ सरपंच नरसिंग पाटील काशिनाथ पाटील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी पारोळा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल महेश पाटील यांना निवेदन दिले

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.