आदिवासी पावरा बांधवाना अतिशय आनंद देणारा आवडणारा सण म्हणजे भोंगऱ्या , आज अंधारमळी येथे भोंगऱ्या चा कार्यक्रम आयोजित केले होते.आदिवासी बांधवाना अतिशय आनंद देणारा आवडणारा सण म्हणजे भोंगऱ्या हा होय, वर्षभर काबाड कष्ट करुण भोंगऱ्या सणानिमित्त आदिवासी बांधव एकत्र या सणानिमित्त येत असतात,वाडया- वस्त्यांवर तरुण -तरुणीसह आबाद वृध्द ढोल ताशांच्या तालावर ब बासरी च्या सुरांनी धुंद होऊन भोंगऱ्या सणाचा मनमुराद आनंद लुटता.
आदिवासी पावरा बांधवाना सर्वांत आवडता व मन उत्साहात करणारा सण म्हणजे भोंगऱ्या दिवाळीला जेवढे महत्व असते, तेवढेच आदिवासी बांधवामध्ये भोंगऱ्या सणास महत्व असते. हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी, पाड्या, वस्त्यावर स्थानिक रहिवाश्यासह बाहेरगावी रहात असलेले पावरा बांधव एकत्र येतात व हा सण जल्लोषात साजरा करतात.
रावेर तालुक्यातील अंधारमळी या गावा मध्ये यंदाही मोठया प्रमाणात हा भोंगऱ्या चा कार्यक्रम पार पडला. बंदोबस्ती अंधारमळी येथील पोलीस पाटील रमजान तडवी, पाल पोलीस स्टेशन , पो कॉ, मुकेश मेढे, पो कॉ संदीप पाटील, होमगार्ड जावेद तडवी, जावेद तडवी, आयोजक मोहमांडली गृप ग्रामपंचायत चे सदस्य जुम्मा तडवी, सलीम तडवी , शाहबीर तडवी , कलिंदर तडवी , जुम्मा इब्राहिम तडवी तसेच गावातील लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.









