सुरेश धस यांच्या मतदारसंघात मोर्चा, सतीश भोसलेला अटक करण्याची मागणी, शिरूरकासारमध्ये बंदची हाक.

 बीडच्या शिरूरकासार येथे सतीश भोसले नावाच्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल असूनही तो फरार आहे. त्याच्या अटकेच्या मागणीसाठी शिरूर शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप आमदार सुरेश धसवरही या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुरेश धस यांनी अगोदरच मान्य केले आहे की, तो माझ्या ओळखीचा आहे आणि तो कधी कधी मला भेटायला देखील येतो.बीडच्या शिरूरकासार येथील सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्यावर गुन्हा दाखल होऊनही तो अद्याप फरार आहे. ढाकणे कुटुंबाच्या मारहाणीच्या निषेधार्थ व खोक्याला तात्काळ अटक करा या मागणीसाठी आज शिरूर शहर बंदची हाक देण्यात आली असून पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या सह अनेक जन सहभागी होणार आहेत. सकाळी नऊ वाजता हा आक्रोश मोर्चा निघणार असून पोलीस स्टेशनवर धडकणार आहे. आरोपीला वाचवणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांना सहआरोपी करा अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे.

सुरेश धस यांच्याच मतदान संघात हा मोर्चा निघताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना टार्गेट करताना दिसले. त्यांनी फक्त धनंजय मुंडे हेच नाही तर पंकजा मुंडे यांच्यावरही टीका केलीये. सतीश भोसले प्रकरणात सुरेश धस अडचणीत अडकल्याचे बघायला मिळतंय. त्यांना हा प्रकरणात सहआरोपी करा, अशी मागणी केली जात आहे. त्यांच्यावरही काही गंभीर आरोप करण्यात आलीत.सतीश भोसले उर्फ खोक्या व त्याचे सहकारी हरणाची तस्करी करणे व त्यातून भरपूर पैसे कमवणे हा मुख्य व्यवसाय करतात. त्याकरिता त्याला वनविभागाचा व राजकीय वरदहस्त असून या सर्व प्रकरणाची चौकशी करावी तसेच वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा.

ढाकणे कुटुंबीयाला मारहाण झाल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक धोकरट यांनी ढाकणे कुटुंबाची तक्रार घेतली नाही, यामुळे ढाकणे कुटुंबाला पोलीस अधीक्षकांकडे जावे लागले परंतु त्या ठिकाणीही तक्रार घेतली नाही याबाबतची चौकशी करावी.या सर्व घटना क्रमामध्ये ओबीसी समाजाच्या गरीब कुटुंबावर पोलीस प्रशासनाकडून अन्याय कोणाच्या दबावाखाली झाला याबाबतची चौकशी करावी. आमदार सुरेश धस आरोपीस वाचवण्यासाठी उघड सहकार्य करत असल्याचे दिसून येत असताना त्यांना सह आरोपी करावे. यासह सतीश भोसलेचे आणखी कुठले अवैध धंदे आहेत या सर्वांचा शोध घ्यावा या प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात येणार आहे. दरम्यान आता या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.