महिलेवर आधी लाकडाने वार, नंतर गळ्यात स्क्रू-ड्रायव्हर भोसकला; महिला दिनाच्या पूर्वसंध्येला भयंकर घडलं.

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एका महिलेसोबत मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. महिलेला निर्दयी वागणूक दिल्याची घटना म्हसळा तालुक्यातून समोर आली आहे.जगभर ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा होतो. कर्तृत्ववान स्त्रियांचा, माता-भगिनी, पत्नीचा सन्मान करणारा हा दिवस आहे. मात्र महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एका महिलेसोबत मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. महिलेला निर्दयी वागणूक दिल्याची घटना म्हसळा तालुक्यातून समोर आली आहे. तिच्या डोक्यात लाकडाने वार करण्यात आला, उशीने तिचे तोंड दाबून तिला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न झाला. यातही जीव जात नव्हता म्हणून त्याने तिच्या गळ्यात स्क्रू-ड्रायव्हर देखील खुपसला आहे. या घटनेमुळे रायगड हादरले आहे.

रायगडच्या म्हसळा तालुक्यतील कुडतुडीवाडीतून ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पीडित महिला घरी कपडे धूत असताना तिचा पहिला नवरा व त्याचा मित्र अचानक दरवाजा ढकलून घरात घुसले. त्यांनी तिच्यावर थेट हल्ला चढवला. दोघांनी महिलेच्या डोक्यात धोपटने घालून तिला खाली पाडले.एवढ्यावरच न थांबता नवऱ्याच्या मित्राने तिचे तोंड उशीने दाबून ठेवले आणि ‘हिचा काटा बऱ्याच दिवसांपासून काढायचा होता, आता चान्स मिळाला आहे, हिला जिवंत सोडायचे नाही’ असे म्हणत तिच्या गळ्यावर स्क्रू-ड्रायव्हर दोन ते तीन वेळा खुपसला. यामध्ये महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.पीडित महिलेने याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपी दुर्वेश धाडवे (रा.नळेफोडी-माणगाव) आणि त्याच्या अज्ञात मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे. तर तिला म्हसळा येथून उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ती जीवन-मरणाची लढाई लढत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.